कृष्णा योजना जलवाहिनी गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा योजना जलवाहिनी गळती
कृष्णा योजना जलवाहिनी गळती

कृष्णा योजना जलवाहिनी गळती

sakal_logo
By

टाकवडे येथे गळती, पाणी उपसा बंद

इचलकरंजी: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या‍ कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला टाकवडे येथे गळती लागल्याने पाणी उपसा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होऊन ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा योजनेच्या वितरण नलिकेला सतत गळती लागत असल्याने त्याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होत आहे. या योजनेच्या वितरण नलिकेला टाकवडेनजीक लक्ष्मी मंदिर परिसरात गळती लागली आहे. या गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने कृष्णा नदीतील पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. गळती काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यां‍नी विरोध दर्शविला आहे. तसेच ज्या ठिकाणी गळती लागली आहे, त्याठिकाणी विजेचा खांब असल्याने खोदाई करण्यात अडचण निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू होते.