101 कोटी निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

101 कोटी निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Published on

१०१ कोटी निधी मंजुरीच्या
अंतिम टप्प्यात : आमदार आवाडे
इचलकरंजी, ता १८ ः शहरातील रस्ते, पाणंद रस्ते, सहा ठिकाणी लहान पूल बांधणे आदी कामांचे १०१ कोटींचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. अन्य लोकप्रतिनिधींनीही शहरासाठी निधी आणल्यास त्यांचेही स्वागतच आहे. कारण निधी विकासासाठी उपयोगी पडणार असल्याचे आमदार प्रकाश आवडे यांनी सांगितले. ते ताराराणी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
बोहरा मार्केट परिसर, आरगे भवन, डोंबारी-कोल्हाटी वस्ती परिसर, निरामय हॉस्पिटल परिसर, आमराई रोड जुना पूल आणि शहापूर स्मशानभूमी परिसर अशा सहा ठिकाणी लहान पूल होतील. त्यासाठी ६२.६३ कोटी खर्च आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासंदर्भात दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. शासनाने १४ पाणंद रस्त्यांसाठी २२.७७ कोटी निधीस मंजुरी दिली. तीन बत्ती चौक ते कित्तुरे मळा रस्त्यासाठी ६.४१ कोटी निधी मंजूर झाला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील १६४ कोटींच्या १७९ कामासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. कृष्णा योजनेची ५.२ किमी अंतराच्या उर्वरित जलवाहिनी बदलाचे टेंडर काढले आहे. त्याची वर्कऑर्डर पुढील आठवड्यात मिळेल. जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी पूर्वी कमान बांधण्याचा घेतलेला निर्णय अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर कमानीऐवजी चौकनी बॉक्स बसवण्याच्या सूचनेस मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश दत्तवाडे, डॉ. राहुल आवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, संजय केंगार उपस्थित होते.
-------------
महापालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद
सहा जलकुंभ उभारणीसाठी शासनाने मंजुरी दिली. परंतु महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवण्यास दिरंगाई होत आहे. १०० शुध्द पेयजल प्रकल्पांसाठी आवश्यक निधी आणून देऊनही ते काम अपूर्णच आहे. कचरा डेपोतील घनकचऱ्याचे बायोमायनिंगकरिता टेंडर काढण्यासंदर्भात आदेश आहेत. मात्र तेथेही कार्यवाही होत नसल्याचे सांगत प्रशासनाच्या भूमिकेबाबत आवाडे यांनी संशय व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.