हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरांची चौकशी व्हावी

हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरांची चौकशी व्हावी

हलगर्जीप्रकरणी आयजीएममधील
डॉक्टरांच्या चौकशीची मागणी
इचलकरंजी, ता. १ : येथील आयजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रेखा पारधे (वय ५२, रा. आमराई मळा) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस करणीभूत असलेल्या डॉक्टरांची चौकशी व्हावी. अन्यथा पाच जूनपासून रुग्णालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले,‘दोन मे रोजी रेखा पारधे यांच्या पोटात दुखत असल्याने त्या खासगी रुग्णालयामध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांना आयजीएममध्ये जाण्याचा सल्ला दिला. रात्री नऊ वाजता आयजीएम रुग्णालयात नेले. त्यावेळी अपघात विभागात उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून स्त्री जनरल विभागात दाखल केले. त्यानंतर रुग्णास त्रास वाढताना नातेवाईक डॉक्टरांना बोलवायला गेले, मात्र आले नाहीत. सकाळी आले व त्यांनी सांगली सिव्हिलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. पण रुग्णाची प्रकृती खालवल्याने त्यांचा सकाळी मृत्यू झाला. याला जबाबदार डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होऊन बडतर्फ करावे. अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’
...
‘संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्य समिती नेमली होती. त्याचा अहवाल नातेवाईकांना दिला आहे. तसेच त्यावेळी उपस्थित डॉक्टरांकडे खुलासा मागवला आहे. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- डॉ. नंदकुमार बणगे, अधीक्षक, आयजीएम रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com