शिवाजी विद्यापिठाचा नावलौकिक वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापिठाचा नावलौकिक वाढवा
शिवाजी विद्यापिठाचा नावलौकिक वाढवा

शिवाजी विद्यापिठाचा नावलौकिक वाढवा

sakal_logo
By

05292
इचलकरंजी : शिवाजी विद्यापीठ आंतरविद्यापीठ खो-खो संघाच्या सराव शिबिराची सांगता समारंभप्रंसगी खेळाडूंसमवेत राहुल खंजिरे, राजन उरुणकर आदी.
-------------
शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवा
राहुल खंजिरे; इचलकरंजीत खो-खो सराव शिबिराची सांगता
इचलकरंजी, ता. ४ : इचलकरंजी ही खो-खो खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाते. मातीतून सराव करणाऱ्या खेळाडूंना खेळाची निश्चितच चांगली कौशल्ये प्राप्त होतात. त्या कौशल्याच्या जोरावर सरस खेळ दाखवित खेळाडूंनी विजयासह शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन राहुल खंजिरे यांनी केले.
येथील नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सतर्फे आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या सराव शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतानाच इचलकरंजी शहराच्या क्रीडावैभवाचा विस्तृत आढावा घेतला.
शिबिरामध्ये निवड झालेले सांगली, कोल्हापूर, सातारामधील २० खेळाडू सहभागी झाले होते. सरावादरम्यान खेळाडूंना राष्ट्रीय खो-खो खेळाडू अमित नवाळे, प्रा. अमित कागले, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. देवेंद्र बिरनाळे यांचे मार्गदर्शन लाभले. हा संघ बसवाडा विद्यापीठ, राजस्थान येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.