बाजारात बटाट्याची आवक सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारात बटाट्याची आवक सुरू
बाजारात बटाट्याची आवक सुरू

बाजारात बटाट्याची आवक सुरू

sakal_logo
By

05315
इचलकरंजी : १) भाजी विक्रेते सोलाना सोलून विक्री करत आहेत.
05314
२) बाजारात इंदोर बटाट्याची आवक वाढली आहे.
--------------
बाजारात बटाट्याची आवक सुरू
वांग्याचे दर वाढले; पेंढीसह सोलाना सोलून विक्रीसाठी
इचलकरंजी, ता. ५ : काही फळभाज्यांची आवक वाढत असल्याने दर कमी तर काहींची आवक घटल्याने दर वाढत आहे. आता बाजारात इंदोरच्या नवीन बटाट्याची आवक सुरू झाली असून जुना आग्रा बटाट्याची कमतरता भासत आहे. नवीन बटाट्याला मागणी वाढली आहे. नवीन बटाट्याची आवकही मुबलक असल्याने दरात घट झालेली आहे.
ओला वाटाणा, फ्लॉवर, कोबीची आवक अधिक आहे. मात्र वांग्याची आवक घसरल्याने दर काहीसे वाढत आहेत. भाजीविक्रेत्यांकडून यंदा प्रथमच सोलाण्याच्या पेंडीसह सोलाना सोलून विक्री होताना दिसत आहे.
फळबाजारात फळांची आवक प्रमाणात होत आहे. संत्रीची आवक कमी पडत असून ग्राहकांची भूक मालटा संत्रीवर अवलंबून आहे. सध्या मालटा संत्रीची आवक कमी आहे. बोरे, चिकू यांची आवक सर्वाधिक आहे. द्राक्षांची आवकही अपेक्षित नाही. फुलबाजारात मागणी घटली आहे. विक्रेत्यांकडे आष्टरची फुले दुर्मिळ झाली आहेत. धान्यबाजारही स्थिर आहे.
-----
प्रतिकिलो रुपये भाजीपाला : टोमॅटो- १० ते १५, दोडका- ४० ते ५०, वांगी- ५०ते ६०, कारली- ३० ते ४०, ढोबळी मिरची- ३० ते ४०, मिरची- ३०ते ४०, फ्लॉवर- २० ते २५, कोबी- १० ते १५, बटाटा- २५ ते ३०, कांदा -२५ ते ३०, लसूण- ४० ते ५०, आले- ६० ते ८०, लिंबू- १५० ते २५० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- ४०ते ५०, ओला वाटाणा -३० ते ४०, भेंडी- ५० ते ६०, काकडी- ४० ते ६०, गवार- ८० ते १००, रताळे -३०ते ४०, दुधी -३० ते ४०, सोललेला सोलाना- ४०० रुपये किलो, पालेभाज्या ५ ते ७ रुपये पेंढी, कोथिंबीर - १० ते १२ रुपये, शेवगा ७ ते ८ रुपये नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१३५ ते१४०, शेंगतेल - १७५ ते १८०, सोयाबीन - १४० ते १४५, पामतेल - ११५, सूर्यफूल -१५५ ते १६०.
- - --- - - -
फुले - झेंडू - ६०, निशिगंध- ९० ते १००, गुलाब -२००, गलांडा- ६०- ८०, शेवंती- ६० ते ८०, आष्टर - १५०.
- - - -- - -
फळे : सफरचंद- ८० ते १६०, संत्री -६० ते १००, मोसंबी-८० ते १००, डाळिंब-८० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरु-३० ते १००, सीताफळ -८० ते १००, खजूर - १५०-२००, कलिंगड -५६ ते ६०, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, द्राक्षे- १८०-२००, केळी ४०ते ५० डझन, देशी केळी - ५० ते ६० डझन, किवी -२०० ते २२०, स्ट्रॉबेरी- ५० ते ६० (लहान बॉक्स), चिंच-१०० ते १४०, लेची - ३५० ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३३ ते ४८, बार्शी शाळू- ४०ते ५०, गहू- ३२ ते ३८, हरभराडाळ -५९ ते ६१, तुरडाळ- १०३ ते १०५, मुगडाळ- ९३ ते ९८, मसूरडाळ- ८३ते ८७, उडीदडाळ- १०० ते १०८, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८० ते ८७, मटकी- १३० ते १३५, मसुर- ८०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी-८०, हिरवा वाटाणा-६०, छोला - १००.

- - - - - - - - - - - -
खाद्यतेलाला मंदीची झळ
खाद्यतेलाच्या दरात सातत्याने चढ उतार सुरू आहे. मागील आठवड्यात कमी झालेल्या दरात ५ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली. दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असताना सध्या खाद्यतेल बाजारात मंदीचे वातावरण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दर कमी होण्याची आशा ग्राहकांना आहे.
-----