घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी
घरफोडी

घरफोडी

sakal_logo
By

इचलकरंजीत ६६ हजारांच्या मुद्देमालाची चोरी

यशवंत कॉलनीतील प्रकार; बंद घराचा कडी-कोयंडा उचकटला

इचलकरंजी, ता. ८ : बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सुमारे ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. घरातील तीन कपाटे फोडत चोरट्यांच्या हाती चांदीचे दागिने, सुमारे दीड ग्रॅम सोने आणि रोख २० हजार रुपये लागले. मात्र आतील खोलीत साडीत गुंडाळलेल्या पाच तोळ्याचा सोन्याचा हार चोरीनंतर तिथेच नातेवाईकांना मिळून आला. ही घटना येथील यशवंत कॉलनीतील. डॉ. आंबेडकर गल्ली नंबर ५ मध्ये आज सकाळी उघडकीस आली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रवी आलासे यशवंत कॉलनीत कुटुंबीयांसह राहतात. शनिवारी (ता. ७) सकाळी हे कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने घर कुलूपबंद होते. याचा फायदा उठवत रात्री चोरट्यांनी आलासे यांच्या घरात चोरी केली. कडी-कोयंडा उचकटून लाकडी आणि लोखंडी कपाट उचकटले. पहिल्या खोलीतील एक लाकडी व लोखंडी कपाट चोरट्यांनी फोडले. मात्र त्यामध्ये त्यांना काहीच मिळाले नाही. त्यानंतर चोरट्यांनी आतील दुसऱ्या खोलीतील तिजोरी फोडली. यामधील सोने, चांदीचे दागिने, रोख २० हजार रुपये असा सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज सकाळी शेजाऱ्यांना निदर्शनास आली. आलासे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने त्यांच्या मुलीने घरात पाहणी केली. या वेळी तिजोरीमध्ये साडीत गुंडाळून ठेलवलेले सुमारे ५ तोळ्याचे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे दिसले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------