
धूमस्टाईल चोरी
इचलकरंजीत धूम स्टाईलने गंठण चोरले
इचलकरंजी : भरदिवसा चोरट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास केले. रस्त्यावर आठवडा बाजारामुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने धूम ठोकली. २५ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शुभांगी भाऊसाहेब महांकाळे (रा. गळतगा, ता. चिकोडी) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना विकली मार्केट परिसरात आज दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शुभांगी महांकाळे या आज दवाखान्यासाठी आल्या होत्या. दुपारी विकली मार्केट परिसरात नारळपाणी खरेदी करीत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसडा मारून तोडून नेले. धूम स्टाईलने २५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी महाकांळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.