नियम पाळणाऱ्यां चालकांचा गुलाब पुष्प देवुन सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियम पाळणाऱ्यां चालकांचा 
गुलाब पुष्प देवुन सत्कार
नियम पाळणाऱ्यां चालकांचा गुलाब पुष्प देवुन सत्कार

नियम पाळणाऱ्यां चालकांचा गुलाब पुष्प देवुन सत्कार

sakal_logo
By

05401
इचलकरंजी : नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचा गुलाब पुष्प देऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सत्कार करण्यात आला.

नियम पाळणाऱ्या चालकांचा
गुलाब पुष्प देऊन सत्कार
इचलकरंजीत अनोखा उपक्रम
इचलकरंजी, ता. १४ : नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचा गुलाब पुष्प देऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सत्कार करण्यात आला. माई हुंड्याई यांच्या सहकार्याने ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. अचानक रस्त्यावर उतरून नियमात राहून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांचा सत्कार केल्याने नियम मोडणाऱ्यांनी यातून चांगला धडा घेतला.
रस्ता वाहतूक अभियानाच्या माध्यमातून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आज त्याचाच एक भाग म्हणून येथील माई हुंड्याई यांच्या सहकार्याने शहरातील वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या वाहनधारकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना वाहतुकीच्या नियमांचे चित्ररूपी पत्रकही देण्यात आले. शहरात सिग्नल यंत्रणेचे पूर्णपणे प्रामाणिकपणाने पालन करणारे, हेल्मेटचा वापर, सिट बेल्टेचा वापर तसेच वाहनांचा वेग मर्यादित ठेवून सुरक्षित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शहरातील शिवतीर्थ चौक, मलाबादे चौक या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. वाहनधारकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाद्दल पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेकडून सर्व वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले. उपक्रमाचे वाहनधारकांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ, माई हुंड्याईचे व्यवस्थापक अमित चव्हाण, बालकल्याण समितीचे माजी सदस्या दिलशाद मुजावर, वाहतूक सल्लागार समिती सदस्य राणे, वाहतूक शाखेचे सर्व अंमलदार उपस्थित होते.