‘डीकेएएससी’मध्ये बुधवारी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डीकेएएससी’मध्ये बुधवारी कार्यक्रम
‘डीकेएएससी’मध्ये बुधवारी कार्यक्रम

‘डीकेएएससी’मध्ये बुधवारी कार्यक्रम

sakal_logo
By

‘डीकेएएससी’मध्ये उद्या कार्यक्रम
इचलकरंजी, ता. १६ : दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात ‘निंभार’ कादंबरीवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम बुधवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजता डीकेएएससी कॉलेज येथे होणार आहे. ही माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय सुतार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. रवींद्र ठाकूर हे ‘निंभार’ कादंबरीवर स्वागतभाष्य करणार आहेत. कवी अरुण म्हात्रे, लेखक व कवी महेश केळुसकर (ठाणे), शशिकांत तिरोडकर (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती आहे. स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मराठी विभाग व वाङ्‌मय मंडळाने विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी या अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. संतोष तेंडुलकर लिखित या ‘निंभार’ कादंबरीचे प्रकाशनही कार्यक्रमात होणार आहे. यानंतर प्रसिद्ध कवी व स्थानिक कवींचे कविसंमेलन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक प्राचार्य डॉ. अनिल पाटील असल्याचे सांगितले. उपप्राचार्य प्रा. डी. ए. यादव, डॉ. डी. सी. कांबळे, मेजर मोहन वीरकर, लेखक संतोष तेंडुलकर आदी उपस्थित होते.