वाढलेले भाजीचे दर उतरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढलेले भाजीचे दर उतरले
वाढलेले भाजीचे दर उतरले

वाढलेले भाजीचे दर उतरले

sakal_logo
By

05444
इचलकरंजी : १) वाढत्या उन्हाने लिंबूचे दर वाढत आहेत.
05445
२) चवळीच्या शेंगा भाजीपाला बाजारात दिसू लागल्या आहेत.
------------
वाढलेले भाज्यांचे दर उतरले
चवळीच्या शेंगा बाजारात; वांगी, लसूण, गवारीची तेजी कायम
इचलकरंजी, ता. १९ : मकर संक्रांतीनंतर भाजीपाला बाजारातील चित्र दिलासादायक आहे. वाढेलेले दर काहीसे कमी झाले आहेत. फळभाज्या व पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. कांदापात, पालक या हंगामी भाज्यांचे दर चढे आहेत. सोलानाची आवक वाढली आहे. नव्या कांद्याची आवक वाढेल तसे दर कमी होत आहेत. वांगी, लसूण, गवारीची तेजी कायम आहे. लांबलचक चवळीच्या शेंगा बाजारात दिसू लागल्या आहेत.
थंडीमुळे पोषक वातावरण असल्याने भाजीपाल्यांची आवक आणि दर पुढील काही दिवस असेच राहू शकतात. फळ बाजारात अनेक फळांची आवक घटली आहे. स्ट्रॉबेरीची आवक अचानक कमी झाल्याने यंदा हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता आहे. थंडीने केळीचा पुरवठा गारठला आहे. प्रति डझन दरात १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. देशी केळ्यांची स्थिती अशीच आहे. रामफळ, हनुमान फळाला मागणी नसल्याने शहरातून बाजारात ही फळे दुर्मिळ होत आहेत. थंडावलेल्या फुल बाजाराने आणखी उसळी घेतली आहे. पुढील आठवड्यात संपणारी अमावस्या आणि सण-समारंभ यामुळे दर आणखी वाढतील. आवक सुधारल्यास दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. मंदीच्या घरात असणारा खाद्यतेल बाजार स्थिर आहे.
----
प्रति किलो रुपये भाज्या : दोडका- ५० ते ६०, वांगी- ८० ते १००, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -५० ते ६०, फ्लॉवर- २० ते २५, कोबी-१५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा -२० ते २५, लसूण- ८० ते १००, आले- ६० ते ८०, लिंबू- २०० ते ३५० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- ४० ते ५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा -७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ८० ते १००, रताळे -३० ते ४०, दुधी -३० ते ४०, पालेभाज्या ८ ते १० रुपये पेंढी, कांदापात, पालक, मेथी -१२ ते १५ रुपये, शेवगा ७ ते ८ रुपये नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१३०-१३५, शेंगतेल - १७५ ते १८०, सोयाबीन -१३५-१४०, पामतेल -११० ते ११५, सूर्यफूल -१५० ते १५५.
- - --- - - -
फुले - झेंडू - ७० ते ८०, निशिगंध- २५०, गुलाब -२५०, गलांडा- ८० ते १००, शेवंती- १०० ते १२०, आष्टर - १५० ते २००.
- - - -- - -
फळे : सफरचंद- ८० ते १६०, संत्री -६० ते १००, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब-८० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरू-३० ते १००, सीताफळ -८० ते १००, खजूर - १५० ते २००, कलिंगड -५६ ते ६०, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, द्राक्षे- १८० ते २००, केळी- ५० ते ६० डझन, देशी केळी -६० ते ७० डझन, किवी -२०० ते २२०, स्ट्रॉबेरी-५० ते ६० (लहान बॉक्स), चिंच- १०० ते १४०, लेची - ३५० ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३३ ते ४८, बार्शी शाळू- ४० ते ५०, गहू- ३२ ते ३८, हरभराडाळ -५९ ते ६१, तूरडाळ- १०३ ते १०५, मूगडाळ- ९३ ते ९८, मसूरडाळ- ८३ ते ८७, उडीदडाळ- १०० ते १०८, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८० ते ८७, मटकी- १३० ते १३५, मसूर- ८०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी-८०, हिरवा वाटाणा-६०, छोला -१००.

- - - - - - - - - - - -
लिंबूच्या दराचा चटका
दिवसा असणाऱ्या उन्हाचा चटका लिंबूच्या दराला सहन करावा लागत आहे. लिंबूचे दर प्रति शेकडा ५० ते १०० रुपयांनी वाढले आहेत. या आठवड्यात शहरात होणाऱ्या लिंबू आवकेवर परिणाम झाला आहे. उन्हाच्या चटक्याने मात्र ग्राहकांना झटका दिला आहे.