
दोन गट वाद
कुरुंदवाडमध्ये दोन गटांत हाणामारी
कुरुंदवाड : जुन्या वादाचे निमित्त काढून शहरातील दोन गटांत येथील भाजी मंडईत जोरदार हाणामारी झाली. अचानक हाणामारी सुरू झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला व तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जमाव पांगला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मोहम्मदयुसूफ गुलामदस्तगीर बागवान यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटात जुना वाद आहे. या वादात संशयित आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आदित्य अनिल बिंदगे, अनिरुद्ध ऊर्फ बंडू अनिल घोरपडे, सम्मेद सुरेश बिंदगे यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.