मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण
मारहाण

मारहाण

sakal_logo
By

तारदाळ येथे एकास मारहाण

तारदाळ : येथील भारत निर्माण पाणी पुरवठ्याच्या माजी अध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल नलवडे, मनोज नलवडे अशी त्यांची नावे आहेत. लग्न कार्यालयात झालेल्या शाब्दीक वादावादीचा राग मनात धरून पाटील मळ्यात बेदम मारहाण केल्याची फिर्याद अशोक चौगुले यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांतून मिळालेली माहीती अशी, तारदाळ येथील एका लग्न कार्यालयात चौगुले आज भोजनासाठी गेले होते. यावेळी भोजन तयार करणारा आचारी व चौगुले यांच्यात वादावादी झाली होती. यानंतर सायंकाळी या वादाचा राग मनात धरून नलवडे व त्याच्या मित्रांनी चौगुले यांना जाब विचारला. धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि बेदम मारहाण केली.