गणेश जयंती पारंपरिक पद्धतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश जयंती पारंपरिक पद्धतीने
गणेश जयंती पारंपरिक पद्धतीने

गणेश जयंती पारंपरिक पद्धतीने

sakal_logo
By

ich254.jpg
78150
इचलकरंजी : पंचगंगा श्री वरदविनायक मंदिरात गणेश जन्म सोहळा उत्साहात साजरा केला. दुसऱ्या छायाचित्रात द्राक्षांचे घड लावून आणि विविध फळांची आरास मांडून वरदविनायकाची सजावट केली.(पद्माकर खुरपे : सकाळ छायाचित्रसेवा)
------------
गणेश जयंती पारंपरिक पद्धतीने
इचलकरंजीत महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसादाचे आयोजन
इचलकरंजी, ता. २५ : गणेश जन्मसोहळा, पाळणागीत आदी कार्यक्रमांनी आणि गणेशभक्‍तांच्या साक्षीत शहरात आज गणेश जयंती पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली. गणेशभक्‍तांनी उत्सवात सहभागी होताना पाळण्यातील बाल गणरायाचे दर्शन घेऊन श्रींच्या चरणी सेवा अर्पण केली. विविध धार्मिक विधी झाले. दुपारी गणेशजन्म सोहळा आणि पाळणागीत सादर केले. महाआरती, तीर्थप्रसाद, आणि महाप्रसाद झाला.
शहरातील नदीवेसचे पंचगंगा वरदविनायक, आपटे वाचन मंदिरनजीक गारेचा गणपती, मंगलधाम, जवाहरनगर येथील गणपती कट्टा, नवसाचा गणपती, सम्राट अशोकनगर अशी विविध गणपती मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईत धार्मिक कार्यक्रमांसाठी सज्ज केली होती. आज दुपारी विविध गणेश मंदिरांत विधिवत पद्धतीने गणेश जन्म साजरा केला. गणेश याग, श्री अभिषेक, पंचामृत आरती, प्रदक्षिणा, गणेश आरती असे धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात झाले. शहरातील पंचगंगा वरदविनायक गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाले होते. जयंतीदिनी मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची सकाळपासूनच मंदिरात रेलचेल सुरू होती. जन्मकाळ साजरा झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप केले. विविध फळांच्या सजावटीमुळे वरदविनायकाचे रूप अधिकच खुलले. येथे महिलांनी गर्दी केली.
शहरातील विविध ठिकाणच्या गणेश मंदिरांसह गल्लोगल्ली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्टेशन रोडवरील जुन्या एसटी बसस्थानकानजीक असलेल्या नवसाचा गणपती मंडळाने यंदाही मोफत सामुदायिक विवाह सोहळा परंपरा कायम ठेवली. यंदाचे २० वे वर्ष असून पाच जोडप्यांचे मोफत विवाह लावून दिले. गारेचा गणपतीजवळ श्री‎ परशुराम‎ सेवा‎ संस्था, महिला विभागातर्फे‎ अथर्वशीर्ष‎ आवर्तन केली. संत मळ्यातील नवशा गणपती मंडळाच्या वतीने ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन भरवले. गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.