बालाजी विद्यालय द्वितीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालाजी विद्यालय द्वितीय
बालाजी विद्यालय द्वितीय

बालाजी विद्यालय द्वितीय

sakal_logo
By

05584
वाठार : बालाजी माध्यमिक विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक रतन काळे यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक प्राप्त केला.

बालाजी विद्यालय द्वितीय
इचलकरंजी : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने यश मिळवले. प्रयोगशाळा गटात द्वितीय क्रमांक विद्यालयाने मिळवला. विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक रतन काळे यांच्या चुंबकत्व या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे, सचिव महेश कोळीकाल, मुख्याध्यापिका सौ. एम. एस. रावळ, उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना विज्ञान विभागप्रमुख आर. ए. नाईकवाडे, ए. एस. डाकरे आदींचे मार्गदर्शन लाभले.
------
शुभम धुमाळला आर्थिक मदत
इचलकरंजी : मैत्री फौंडेशनने किडनीने विकारग्रस्त असलेल्या शुभम धुमाळ यांना आर्थिक मदत दिली. फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड यांनी मैत्री फौंडेशनच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा अहवाल सादर केला. अध्यक्षस्थानी रमेशकुमार जैन होते. त्यांनी मैत्री फौंडेशनच्या कामाचे कौतुक करून मदतीचे आश्वासन दिले. जयंतीलाल सालेचा, रामदेव राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक खोत, मैत्री ग्रुपचे अध्यक्ष संजय घाटगे, मैत्री महिला अध्यक्ष सौ. वहिदा नेजकर, सदस्य अनिल आलासकर, प्रफुल्ल घाटगे आदी उपस्थित होते.
-----
विद्यार्थ्यांकडून वाचनालयाची पाहणी
इचलकरंजी : भारतमाता विद्या मंदिर क्रमांक ३३ मधील विद्यार्थ्यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाची पाहणी केली. वाचनालयातील बाल विभागातील तसेच अन्य पुस्तके, वृत्तपत्रे व नियतकालिके, संदर्भग्रंथ, पुस्तक देवघेव आदींची पाहणी केली. पुस्तक हाताळणी व पुस्तक वाचन याचा आनंद घेतला. सौदामिनी कुलकर्णी यांनी सर्व ग्रंथालयाची माहिती दिली. ग्रंथालयात असलेला समृद्ध बाल विभाग, बाल व युवा वाचकांसाठी असलेली पुस्तके यांची ओळख करून दिली. त्यांनी वाचनाचे महत्त्व सांगून फावल्या वेळात वाचनालयात वाचनासाठी येण्याचे आवाहन केले. प्रसाद कुलकर्णी यांनी शिक्षक प्रतिनिधींचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. स्वरदा देशपांडे, निलोफर बारगीर, पल्लवी महाजन, स्वाती कोडीलीकर, गौतमी कुंभार, निशा मिरजे, श्रद्धा बरगाले, अफ्रोजा इनामदार आदी उपस्थित होते. निलोफर बारगीर यांनी आभार मानले.
-----
जानकी वृद्धाश्रमात केशकर्तन
इचलकरंजी : संजय काशीद व स्वप्नील काशीद या पितापुत्रांनी जानकी वृद्धाश्रम घोसरवाड (ता. शिरोळ) येथील वृद्धांचे मोफत केशकर्तन केले. महाराष्ट्र शासनाकडून कुष्ठरोग निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तीस वर्षे या सप्ताहात महाराष्ट्र राज्यातील विविध कुष्ठ वसाहतींमध्ये मोफत केशकर्तनाचा कार्यक्रम ते करीत आहेत. त्यामध्ये आनंदवनाचाही समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून यंदा त्यांनी जानकी वृद्धाश्रमातील वृद्धांचे केशकर्तन केले. यावेळी बाबासाहेब पुजारी, सौ. पूर्वा पुजारी उपस्थित होते.