विवाहिता आत्महत्या

विवाहिता आत्महत्या

Published on

कबनूरला नवविवाहितेची आत्महत्या
इचलकरंजी : कबनूर (ता हातकणंगल) येथे एका नवविवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली. सौ अर्चना आबांना सुतार (वय 25) असे तिचे नाव आहे. या घटनेची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अर्चना हिचा सात महिन्यांपूर्वी कबनूर येथील आबांना सुतार याच्याबरोबर विवाह झाला होता. गुरुवारी (ता.९) दुपारी राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. हे समजतात नातेवाईकांनी तिला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.