
इचलकरंजीत प्रेमगीत गायन कार्यक्रम
इचलकरंजीत प्रेमगीत गायन कार्यक्रम
इचलकरंजी : स्वरतरंग ॲकॅडमीतर्फे प्रेमगीत गायनाचा कार्यक्रम झाला. श्रीपती कोरे यांनी प्रेमाची व्याख्या विशद करून सर्व नात्यांतील प्रेमाचे महत्त्व समजावून सांगितले. विजय कसलकर, बिनॉय किणीकर, उत्तम भाट, महेश गोरे, सचिन माने, सुभाष पोवार, प्रताप जाधव, सुभाष जगताप, श्रीकांत कुंभार, बळवंत कांबळे, किशोर माने आदींनी गाणी सादर केली. सूत्रसंचालन सौ. शुभांगी कोरे यांनी केले. आभार सौ. भक्ती माळी यांनी मानले. वैभव माळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
-------
‘गंगामाई’मध्ये बालप्रदर्शन
इचलकरंजी : गंगामाई बालक मंदिरात बालप्रदर्शन झाले. प्रदर्शनाचा विषय बारा बलुतेदार असा होता. लहान व मोठ्या गटातील मुलांनी सोनार, चांभार, लोहार, नाभिक, धोबी आदी वेशभूषा करून सहभाग घेतला. मुलांनी बारा बलुतेदारांची माहिती दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सौ. अनूताई लक्ष्मीश्वर यांच्या हस्ते झाले.
----
मुसळे बाल विद्यामंदिरात स्पर्धा
इचलकरंजी : तात्यासाहेब मुसळे बाल विद्यामंदिरात विविध स्पर्धा झाल्या. कै. तात्यासाहेब मुसळे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. शहरस्तरीय स्पर्धेत सुमारे ५० शाळांनी सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेसाठी २७२ विद्यार्थी, तर कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेसाठी १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. काकडे यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे, सचिव श्री. साखरे, संचालक महेंद्र सातपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक म्हणून संदीप कोळी, सौ. रेखा पाटील, सौ. सुनीता लडगे, सौ. आरती लाटणे आदींनी काम पाहिले.
---
सचिन देवरुखकर यांची फेरनिवड
इचलकरंजी : येथील सुवर्णकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन देवरुखकर यांची फेरनिवड केली. इचलकरंजी परिसर सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित निवडी झाल्या. कार्यकारिणीत उपाध्यक्ष राजू कदम, सचिव जतिन पोतदार, खजिनदार सचिन कापसे, संचालक सुहास आवळकर, विकास यादव, संतोष भाटले, इम्तियाज शेख, सुनील चौगुले, नितीन पोतदार, विजय मडके यांचा समावेश आहे. नंदकुमार वेदपाठक यांनी प्रास्ताविक केले.
---