
निवृत्त शिक्षकांचे समाजासाठी योगदान श्रेष्ठ
ich225.jpg
84532
इचलकरंजी : निवृत्त प्राथमिक शिक्षक वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात वयाची ७५ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचा अलका स्वामी यांच्याहस्ते सत्कार केला.
-------------
निवृत्तीनंतरही शिक्षकांचे योगदान
अलका स्वामी; इचलकरंजीत ७५ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार
इचलकरंजी, ता. २२ : निवृत्त शिक्षकांनी सेवेत असतानाही विद्यार्थ्यांवर संस्कार केले आहेत. आदर्श नागरिक घडवले आहेत. सेवेतून मुक्त झाल्यानंतरही ते समाजाची सेवा करत आहेत, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केले.
येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित ७५ वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. सदाशिव पाटील, महादेव लंबे, प्रेमला डकरे, सुनंदा कुंभार, गणपती कांबळे, अमीर मुल्लानी, श्रीमती शालिनी पाटील, रोहिणी बन्ने, के. एस. पाटील, खुतबुद्धीन अत्तार, श्रीमती आनंदी आवळे, इंदुमती मट्टीकल्ली, जयश्री नवांगुळ या निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
असोसिशनचे अध्यक्ष नारायण केकले यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. बाबासो कोळी, शंकरराव कांबळे, महादेव लंबे, मारुती गुरव, शिवाजी आडके, के. डी. कांबळे, मालती कोळी, श्रीमंती चौगुले आदी उपस्थित होते. नारायण कुंभार यांनी प्रास्ताविक केले. वेणुताई कुडचे यांनी स्वागत केले. श्रीकांत दौंडे यांनी आभार मानले.