
‘हिराज श्री २०२३’ स्पर्धेचे आयोजन
‘हिराज श्री २०२३’
स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी, ता. २५ : येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळेच्या मैदानात ‘हिराज श्री २०२३’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
१ मार्चला सायंकाळी ६ वाजता स्पर्धा होणार आहे. पुरुष गटात होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्रातून तसेच सीमा भागातून ४०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी पाच लाखांची बक्षिसे ठेवली आहेत, अशी माहिती ‘हिराज’चे प्रमुख दीपक माने यांनी दिली.
दहा गटांत स्पर्धा होणार आहे. ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ आणि ८५ च्यावर असे आठ वजनी गट असतील. प्रत्येक उंचीनुसारही १७० सेंमीच्या खाली व वर असे दोन गट असणार आहेत. ‘हिराज श्री’ विजेत्याला रोख ५१ हजार १११ रुपये तर उपविजेत्या २१ हजार १११ रुपयांचे पारितोषिक आहे. बेस्ट म्युझिक पोझरला ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस आहे. प्रेक्षकांचीही संख्या मोठी असल्याने बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. बाळासाहेब माने, विपुल राठोड, सुजय शेळके, अमोल कुलकर्णी, दिलीप पाटील, राज मंगे, सूरज गिरी, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.