अपघात मयत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात मयत
अपघात मयत

अपघात मयत

sakal_logo
By

05750
...

दुचाकीवरील ताबा सुटल्याने
चंदूर येथील तरुणाचा मृत्यू

इचलकरंजी, ता.४ : चंदूर ( ता. हातकणंगले) येथे भरधाव वेगाने निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर फरफटत जात मृत्यू झाला. अविनाश बाळू कांबळे (वय ३४, रा. डॉ आंबेडकर पुतळ्याजवळ,चंदूर) असे त्याचे नाव आहे. एका पादचारी महिलेला जोराची धडक देत तो सुमारे २०० फूट पुढे फरफटत जाऊन रस्त्यावर आपटला. अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसातून मिळालेली माहिती अशी, या अपघातात जखमी झालेल्या छाया कृष्णा भोसले ( वय ६५, रा.बिरदेव मंदिरसमोर, चंदूर) या शुक्रवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी मुख्य मार्गावरून निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत अन्य महिलाही होत्या. दरम्यान, अविनाश हा मोटारसायकलवरून भरधाव वेगाने चंदूरच्या दिशेने येत होता. यावेळी छाया यांना त्याने जोरात धडक दिली. मोटारसायकलसह फरफटत जाऊन तो रस्त्यावर आपटला.या अपघातात तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केला. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला .