मारहाण मयत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण मयत
मारहाण मयत

मारहाण मयत

sakal_logo
By

कबनूर येथील हल्ल्यातील
जखमी कामगाराचा मृत्यू

इचलकरंजी, ता.८ : कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका हॉटेलसमोर झालेल्या हल्ल्यातील जखमी परप्रांतीय कामगाराचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. योगेशकुमार घिसीयवान पासवान (वय ३५, मूळ गाव बैदोलागड-उत्तर प्रदेश. सध्या रा. साईनगर कबनूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू पाटील याच्यासह अन्य अनोळखी तीन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यातील तिघे गेल्या सात दिवसांपासून फरार आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पासवान आणि पप्पू पाटील यांचा आर्थिक देवघेवीतून जुना वाद होता.याच वादातून १ मार्चला कबनूर येथील कोल्हापूर रोडवरील एका हॉटेलसमोर त्यांच्यात वाद झाला.पप्पू याने अन्य तीन साथीदारांसह ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.काठी व लाथाबुक्क्यांनी पासवान याला मारहाण जबर मारहाण केली. या हल्ल्यात पासवान गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते.हल्लेखोर पसार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पासवान हा प्लास्टिक गोळा करण्याचे काम करीत होता. याप्रकरणी मीना योगेशकुमार पासवान यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
----