
पोलीस वृत्त
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एका गुन्हा दाखल
इचलकरंजी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक उर्फ बंट्या विलास खोंगे ( वय 22 ) असे त्याचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलीला प्रतीक याने मोबाईल नंबर लिहून चिठ्ठी दिली आणि फोन करण्यास सांगितले. यानंतर काही दिवसांनी ही पीडित मुलगी घराशेजारील असणाऱ्या किराणा दुकानात गेली होती. यावेळी प्रतीक याने लाईट गेल्याचा गैरफायदा घेतला. पीडित मुलीचा जबरदस्तीने हात धरून फोन कर असे म्हणत छेड काढली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीनुसार त्याच्यावर शहापूर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोअंतर्गत कारवाई केली.
--------
मित्राकडे पायी चाललेल्या एकाला चौघांची मारहाण
इचलकरंजी : मित्राकडे पायी चालत निघालेल्या एकाला चौघा मित्रांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्निल फातले, शिवम लोखंडे, वासु लोखंडे, भूषण पाटील (सर्व रा.इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अनिकेत पांडुरंग होगाडे (वय 28 ) याने दिली. ही घटना तांबे माळ येथील मराठी हायस्कूलजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होगाडे हा रविवारी दुपारी (ता.२६) मित्राकडे पायी चालत निघाला होता. तांबे माळ येथील मराठा हायस्कूलजवळ आल्यावर त्याच्या पाठीमागून स्वप्नील फातले आला. त्याने होगाडे याला विनाकारण शिवीगाळ करत तोंडावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे साथीदार शिवम व वासु लोखंडे यांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा प्रतिकार करत असताना भूषण पाटील यानेही होगाडे याला काठीने नाकावर मारून जखमी केले.
--------