विविध उपक्रमांनी कामगार दिन

विविध उपक्रमांनी कामगार दिन

इचलकरंजी : महानगरपालिकेतर्फे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले.
------------
विविध उपक्रमांनी कामगार दिन
इचलकरंजीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन, रक्तदान शिबिर, साहित्य वाटपाचे आयोजन
इचलकरंजी, ता. २ : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सोमवारी शहराच्या विविध भागांत उत्साहात साजरा झाला. शहरातील विविध संघटना, शाळा, महाविद्यालये, संस्था, सरकारी कार्यालये आणि राजकीय पक्षांच्या शाखा आणि कार्यकर्त्यांतर्फे ध्वजवंदन, रक्तदान शिबिरे, साहित्य वाटप असे कार्यक्रम आयोजित केले होते. विविध कामगार संघटनांनी आपापल्या कार्यालयांमध्ये कामगार दिन साजरा केला. यावेळी कामगार मेळावे, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
*इचलकरंजी महानगरपालिका
महानगरपालिकेतर्फे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील भिंतीवर साकारलेल्या नूतन लोगोचे अनावरण आयुक्त श्री. देशमुख यांनी केले. प्रभारी उपायुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता संजय बागडे, शहर अभियंता भागवत सांगोलकर आदी उपस्थित होते.

*बालाजी माध्यमिक विद्यालय
सद्‍गुरू पंत महाराज शिक्षण संस्थेच्या संचालिका सुंदर जोशी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यांनी सतत ज्ञानार्जन करत स्वतःचा, समाजाचा, देशाचा विकास करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एम. एस. रावळ यांनी केले. संस्थेचे संचालक संदीप जाधव, उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर, बालाजी विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका निशा कणसे, रंजना घोरपडे आदी उपस्थित होते.

*दि न्यू हायस्कूल
कामगार नेते शामराव कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. श्री. कुलकर्णी यांनी जग आणि भारत यांच्यातील कामगार चळीवळीबाबत असणारा फरक विशद केला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शेखर पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांनी केले. आभार बी. ए. कोळी यांनी मानले.

*आंतरभारती विद्यालय
प्रमुख पाहुणे राहुल खंजिरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरभारती स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शामराव नकाते होते. मुख्याध्यापक एम. डी. पाटील आदी उपस्थित होते.

*डीकेएएससी महाविद्यालय
ध्वजवंदन प्राचार्य अनिल पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. प्रा. डी. सी. कांबळे, डॉ. प्रा. डी. ए. यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिमखानाप्रमुख मुजफ्फर लगीवाले, एनसीसी ऑफिसर मेजर मोहन विरकर, प्रा. प्रशांत कांबळे, ज्युनिअर विभागप्रमुख एम. बी. पाटील यांनी केले.

* कम्युनिस्ट पक्ष
ध्वजवंदन लाल बावटा युनियनचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर पाटील यांनी केले. ध्वजाला सलामी देणारे गीत सदा मलाबादे, दत्ता रावळ यांनी गायिले. भाऊसाहेब कसबे यांनी कामगार दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. शिवगोंडा खोत, जैनफबी नदाफ, रामचंद्र पोला, धनु भांडे, गोपाळ पोला, आनंदा वाघमारे, अंबादास कुणगिरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष कांबळे यांनी केले. आभार आनंदराव चव्हाण यांनी मानले.

* भाकप कार्यालय
राजेंद्र पांगरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दादासाहेब जगदाळे, बाळासो चौगुले, दादू मगदूम, दत्तात्रय घोगरे, शंकर खांडेकर, महादेव भिसे आदी उपस्थित होते.

* पोदार इंटरनॅशनल स्कूल
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापक ईश्वर पाटील उपस्थित होते. शिक्षकांनी लेझिमद्वारे महाराष्ट्राबद्दल आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिनाचे गीत गायिले. आभार वर्षा पवार यांनी मानले.

* नरदे हायस्कूल, नांदणी
प्रशांत दड्डे व अलका दड्डे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे संचालक सागर शंभूशेटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ नरदे होते. विशाखा सुतार व सोहम तंबाके या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

*इचलकरंजी हायस्कूल
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र गीत श्री. जी. जी. कुलकर्णी आणि विद्यार्थ्यांनी सादर केले. पायल कडवाले आणि गार्गी खोत या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र व कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. एच. उपाध्ये, पर्यवेक्षक यु. पी. पाटील, व्ही. एस. गुरव उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. पी. लोटके यांनी केले.
* सरस्वती हायस्कूल
ध्वजवंदन प्रमुख पाहुणे रवी रजपुते यांच्या हस्ते झाले. गीत मंचातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत व भारताचे संविधान सादर केले. आर. एन. जाधव यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस. डी. परीट यांनी करून दिला. आभार पी. जी. हजगुळकर यांनी मानले. सूत्रसंचालन अनुराधा काळे यांनी केले. मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, मुख्याध्यापक संजय रेंदाळकर आदी उपस्थित होते.
----------
हातकणंगले परिसर
हातकणंगले ः महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजवंदन झाले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ते झाले. आवाडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार दिगंबर सानप, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील आदी उपस्थित होते. श्रीमंत रामराव इंगवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत गायिले.
------
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल
जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा झाला. दीपप्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी केले. डॉ. महावीर अक्कोळे, आप्पासाहेब भगाटे, बाळासाहेब इंगळे, डॉ. धवल पाटील, आदिनाथ नरदे आदी उपस्थित होते. संस्कार शिबिराचे उद्‍घाटन अशोक मादनाईक यांच्या हस्ते झाले. लाठी-काठी व तलवारबाजी या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक रवि आमणे, प्रतिक कुरडे, अमित माणगांवे, विजय हणबर यांनी दाखवले. योगासनाचे प्रात्यक्षिक अमृता पाटील व शुभम झेंडे यांनी दाखवले. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
-------
कबनूर परिसर
कबनूर ः परिसरात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा झाला. कबनूर ग्रामपंचायतीमध्ये सफाई कर्मचारी सुमन शेडगे यांच्या हस्ते ध्वजपूजन व कर्मचारी शंकर कांबळे, मारुती वडर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुनील काडाप्पा, माजी सरपंच मधुकर मणेरे आदी उपस्थित होते. कबनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे संचालक सुरेंद्र केटकाळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थाध्यक्ष जयकुमार कोले यांच्या हस्ते सत्कार झाला. कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, इंदिरा गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष अशोक वसगडे, प्राचार्या उर्मिला माने आदी उपस्थित होते. जवाहरनगर हायस्कूलमध्ये कबनूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुभाष काडाप्पा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव जुगळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्राचार्या डॉ. योजना जुगळे, हिराताई मुसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com