ST Bus
ST Busesakal

kolhapur : अन् तिने धावत्या बसमधून मारली उडी, इचलकरंजीतील प्रकार; युवती गंभीर जखमी, प्रवाशांचा आरडाओरडा

अचानक घडलेल्या प्रकारानंतर प्रवाशांनी आरडाओरडा करताच एसटी थांबली, तातडीने प्रवाशांनीत तिला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

इचलकरंजी - कर्नाटक महामंडळाच्या धावत्या एसटी बसचा अचानक दरवाजा उघडला अन त्यातून तरूणीने थेट बाहेर उडी मारली. सुदैवाने परिसरात पुलाचे काम सुरु असल्याने तेथे टाकलेल्या दगडांवर ती जोराने आपटल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अचानक घडलेल्या प्रकारानंतर प्रवाशांनी आरडाओरडा करताच एसटी थांबली, तातडीने प्रवाशांनीत तिला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोशल मीडियावर तरुणाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर रात्री तिची ओळख पटली. याबाबत युवतीच्या नातेवाईकांनी कोणतीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

ST Bus
Kolhapur : शेतकऱ्यांच्‍या माथी लिंकिंग खत; केवळ युरियासाठी अन्‍य खते विकत घेण्याची वेळ

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील मध्यवर्ती बसस्थानकातून इचलकरंजी- बागलकोट ही कर्नाटक एसटी धावत होती. ही एसटी बस नदीवेस रोडवर आली असतानाच एसटीत बसलेल्या एका तरुणीने अचानकपणे धावत्या एसटीचे दार उघडून बाहेर उडी टाकल्याचे बसमधील प्रवाशांची सांगितले. बाहेरील दगडांवर ती जोराने आपटल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

प्रवाशांनी आरडाओरडा करताच एसटी थांबली. जखमी तरुणीला नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. युवतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरात शासकिय रुग्णालयात हलवले.

सोशल मीडियावर तरुणाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नातेवाईक रुग्णालयात पोहचले व जखमीची ओळख पटली. दरम्यान, संबधीत तरूणीला बसमध्ये मळमळू लागले. यावेळी तिने दरवाजा उघडला असता ती तोल जावून रस्त्यावर पडल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी जबाबात कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितल्यानंतर थांबवून घेतलेली बस पुढच्या प्रवसाला सोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com