Wed, October 4, 2023

घरफोडी
घरफोडी
Published on : 31 May 2023, 4:55 am
कोरोचीत घरफोडी, लाखाचा मुद्देमाल चोरीस
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले. सोन्या -चांदीचे दागिने, रोख रुपये असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबतची फिर्याद शोभा सदाशिव संकपाळ (वय ४५) यांनी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संकपाळ कुटुंबीय देवदर्शनासाठी शनिवारी(ता. २७) परगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. याचा फायदा उठवत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी तिजोरीचे लॉकर तोडून दीड तोळे सोन्याचे दागिने, चार हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, रोख ४५ हजार रुपये असा एकूण १ लाख ५ हजार पाच रुपयांचा मुद्देमाल चोरला.