
डीकेएएससी महाविद्यालयात चर्चासत्र
06401
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात नव्या शिक्षण धोरणातील अभ्यासक्रम व श्रेयांक पद्धतीवर चर्चासत्र झाले.
डीकेएएससी महाविद्यालयात चर्चासत्र
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात ‘नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम व श्रेयांक पद्धती’ या विषयावर चर्चासत्र झाले. नवे शैक्षणिक धोरण आराखड्यास अनुसरून २० एप्रिल २०२३ च्या शासकीय परिपत्रकानुसार येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया राबवण्याबाबत अभ्यासक्रम रचना व श्रेयांक पद्धती कशी असेल याबाबत चर्चासत्रात विचारमंथन केले. डॉ. ए. एम. शेख व डॉ. ए. पी. जाधव या दोन विषयतज्ज्ञांनी अनुक्रमे विज्ञान व मानव्यविद्या तसेच वाणिज्य शाखेच्या बदलणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया आणि श्रेयांक पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तर सत्रात अनेकविध प्रश्नांची तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनिल पाटील यांनी केले. आभार प्रा. डी. ए. यादव यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. प्रभा पाटील यांनी केले.
--------
06402
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थिनी स्नेहमेळाव्यात स्मिता बुगड यांनी मार्गदर्शन केले.
कन्या महाविद्यालयात स्नेहमेळावा
इचलकरंजी : येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये आजी-माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व माजी विद्यार्थिनी संघटनेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रसिद्ध खो खो आणि कबड्डीपटू स्मिता बुगड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाशी असणारे ऋणानुबंध आयुष्यभर जपावेत. विद्यार्थिनींनी आपल्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन आयुष्यात यशाची अनेक शिखरे पार करावे, असे मार्गदर्शन बुगड यांनी केले. शाहीन चौगुले आणि श्वेता जाधव या माजी विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. त्रिशला कदम होत्या. स्वागत आणि प्रास्ताविक गृह विज्ञान विभाग प्रमुख प्रा. संगीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले. आभार डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी मानले.
------