इचलकरंजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

इचलकरंजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

06439
इचलकरंजी : शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास नगरपालिकेच्यावतीने अभिवादन केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त सुधाकर देशमुख, माजी आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते.
-----------
इचलकरंजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
इचलकरंजी, ता. ६ : शहरात शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा केला. येथील शिवतीर्थवरील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भव्य भगवा झेंडा फडकावुन शिवराज्याभिषेक दिन झाला. विविध उपक्रमांनी पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी राज्याभिषेक दिनाला शोभा आणली. अनेक मंडळांनी शहरातून सवाद्य मिरवणूक काढत पारंपरिक खेळांचे आयोजन केले.
महानगरपालिकेतर्फे शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास, छत्रपती शिवाजी उद्यानातील महाराजांच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन केले. आमदार प्रकाश आवाडे, प्रशासक तथा आयुक्त सुधाकर देशमुख, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण शाहिर गंगाराम नलवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. प्रभारी उपायुक्त केतन गुजर, शिवाजीनगर पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, शिवतीर्थ समिती अध्यक्ष पुंडलिक जाधव, अजितमामा जाधव, माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार आदी उपस्थित होते.
येथील शिवश्री प्रतिष्ठानतर्फे शहरात पारंपरिक वेशभूषेत सवाद्य मिरवणूक काढली. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन केले. मिरवणुकीत या महिला व पुरुष मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com