जुनी पुस्तके खरेदीसाठी रांग

जुनी पुस्तके खरेदीसाठी रांग

ich141.jpg
09340
इचलकरंजी : जुनी पुस्तके खरेदीसाठी दुकानांमध्ये पालक, विद्यार्थी रांगा लावून उभे राहत आहेत.
----------------
जुनी पुस्तके खरेदीसाठी रांग
इचलकरंजीतील चित्र; यावर्षी जुन्या पुस्तकांच्या किमतीत ३० टक्यांनी वाढ
इचलकरंजी, ता. १४ : महागाई वाढली असताना जुने ते सोने म्हणत विद्यार्थी, पालकांची शालेय पाठ्यपुस्तके खरेदी करताना गर्दी होत आहे. यावर्षी पुस्तकांच्या किमती तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याने पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. त्यामुळे पालक यंदा विद्यार्थ्यांचे भविष्य जुन्याच पुस्तकांतून घडवताना दिसणार आहेत. बाजारात जुन्या पुस्तकांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून उलाढालही मोठी होणार आहे. सध्या जुनी पुस्तके खरेदीसाठी दुकानांमध्ये पालक, विद्यार्थी रांगा लावून उभे राहत असल्याचे चित्र आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके देण्यात येतात. मात्र नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विकतच घ्यावी लागतात. अशी सर्व पुस्तके बाजारात यंदा आवाक्याबाहेर गेली आहेत. झालेली वाढ पालकांना घाम फोडणारी आहे. शाळेची तयारी करताना नवीन कपडे, वह्या, दप्तर यांसह लागणारे साहित्य याचे बजेट वाढत्या महागाईत हजारोंच्या घरात जात आहे. यातून स्वस्ताईचा मार्ग काढत पालकांसमोर जुन्या पुस्तकांचा पर्याय बजेट आटोक्यात आणणारा आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी पालकांची पहिली पसंती जुन्या पुस्तकांना मिळत आहे. शहरातील जुनी पुस्तके विक्री दुकानात दिवसभर विद्यार्थी, पालकांची गर्दी होत आहे.
पुस्तके खरेदी करण्यासाठी जात असलेले पालक आणि विद्यार्थी वाढलेल्या किमती पाहून आश्चर्यचकित होत आहेत. नवीन पुस्तके खरेदी करण्याकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहेत. जुनी पुस्तके घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा बाजारात जुन्या पुस्तकांची उलाढाल वाढत आहे.
जुनी पुस्तके विक्री करणारे किरकोळ विक्रेतेच शहरात आहेत. यावर्षीची मागणी पाहता जुन्या पुस्तकांचा साठा लवकर संपून जाईल, असे चित्र आहे. त्यातून जुनी पुस्तके उपलब्ध न झाल्यास नव्या पुस्तकांना पसंती मिळू शकते. दोन वर्षांपासून पुस्तकांच्या किमती जशा वाढतील, तशी जुन्या पुस्तकांना पसंती मिळताना दिसत आहे.
----
अर्ध्याने खरेदी, पाऊणने विक्री
जुनी पुस्तके दुकानदार हे अर्ध्या किमतीने खरेदी करतात व पाऊण किमतीत विक्री करतात. या तत्त्वाने जुनी पुस्तके खरेदी-विक्री केली जातात. अनेक पालक, विद्यार्थी जुनी पुस्तके देऊन लागणारी जुनी पुस्तके खरेदी करतात. त्यामुळे जुनी पुस्तके वापरात येत असून पालक सहसा नवीन पुस्तकांच्या भानगडीत पडत नाहीत.
- - - - - - -
पुस्तकपेढींचा आधार
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वर्षभर वापरायला मिळावीत, या उद्देशाने काही सामाजिक संस्था काम करत आहेत. या पुस्तकपेढीचा महागाईत मोठा आधार विद्यार्थ्यांना मिळत आहे. यंदा मागणी वाढल्याने या संस्थांनी पुस्तक संचांची संख्या वाढवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com