जीवघेणा हल्ला

जीवघेणा हल्ला

Published on

इचलकरंजीत पोलिस ठाण्यासमोरच
तरुणावर प्राणघातक हल्ला

इचलकरंजी, ता.१८ : आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात अभिषेक बजरंग खांडेकर (वय २१) हा गंभीर जखमी झाला असून विमल प्रकाश पाटील (वय ६५) याही जखमी झाल्या आहेत.
धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने गंभीर जखमी झालेल्या खांडेकर याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रावसाहेब गोसावी, उमाजी गोसावी, अजय जुवे (तिघे रा. गोसावी गल्ली) यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर किरकोळ कारणावरून संशयित रावसाहेब गोसावी व जखमी विमल पाटील यांच्यात वाद झाला. या वादात रावसाहेब याने वृध्द पाटील यांना मारहाण केली. आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी अभिषेक खांडेकर हे शिवाजी नगर पोलिस ठाण्यात जात होते. याचवेळी रावसाहेब गोसावी पोलिस ठाण्याच्या बाहेरच्या मार्गावर खांडेकर यांच्या अंगावर धावून गेला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. रावसाहेब याच्यासोबत आलेल्या अजय जुवे, उमाजी गोसावी यासह तिघांनी धारदार शस्त्रासह खांडेकर यांच्यावर हल्ला चढवला. तिघांनी कोयता, कटर, ब्लेडने खांडेकर यांच्या पाठीवर वार केले. आसपासच्या नागरिकांची गर्दी जमताच संशयित पसार झाले. जखमी खांडेकर याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खांडेकर यांच्या फिर्यादीनुसार चौघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.