अपघात ठार

अपघात ठार

एसटीमधून खाली उतरताना
जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

इचलकरंजीत बुधवारी झाला होता अपघात

इचलकरंजी, ता.६ : वाहकाने सूचना केल्यानंतर एसटी पुढे घेताना बसमधून खाली उतरणाऱ्या एका महिलेला मृत्यूला सामोरे जावे लागले. गुलताज महंमदअली शेख (वय ५५, रा. सांगली नाका शहापूर) असे मृत्यू झालेल्या त्या महिलेचे नाव आहे.
एसटी पुढे गेल्याने तोल जाऊन चाकाखाली सापडल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या जखमी महिलेचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी चालक रोहित मधुकर सूर्यगंध (वय ३0, रा.ओझर्डे, ता. वाळवा) याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सांगली नाका परिसरातील समीर कुरेशी यांच्या सासू गुलताज शेख या (एम. एच. ०६ एस ८३०५) बसमधून सांगली नाका येथे आल्या. बुधवारी(ता.५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एसटी बसमधून त्या उतरत होत्या. यावेळी वाहकाने बस पुढे नेण्याची सूचना केली. त्यानुसार चालकाने ती सुरू करून पुढे नेली.
दरम्यान, बसमधून उतरणाऱ्या गुलताज शेख या प्रवासी महिलेचा तोल गेला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. यावेळी ही महिला बसखाली सापडल्याने पाठीमागील चाक त्यांच्या पोटावरून गेले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद समीर सलीम कुरेशी (रा. सांगली नाका) यांनी पोलिसांत दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com