महानगरपालिका करणार शाळा डिजिटल

महानगरपालिका करणार शाळा डिजिटल

Published on

ich112.jpg
15471
इचलकरंजी : रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे दीपक निंगुडगेकर यांच्याकडे सोपवताना नासिर बोरसादवाला यांसह पंकज कोठारी, राजेश कोडुलकर उपस्थित होते.

महानगरपालिका करणार शाळा डिजिटल
नासिर बोरसादवाला; रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे पदग्रहण

इचलकरंजी, ता. ११ : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी तन मन धन अर्पण करून काम करीत असते. समाजाला समृद्ध करण्याचा प्रयत्न प्रत्येक रोटेरियन करत असतो. प्रत्येक घटकाची गरज लक्षात घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न रोटरी करत असते. इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य मुले शिकतात. या शाळा डिजिटल करण्यासाठी येत्या काळात रोटरी प्रयत्न करणार असल्याचे मत रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांनी व्यक्त केले.
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या २०२३-२४ चा पदग्रहण सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, सायकलीचे वाटप तसेच एका दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकल, गरजू महिलांना शिलाई मशीन दिले. श्री. बोरसादवाला यांच्याहस्ते रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष दीपक निंगुडगेकर आणि सचिव पंकज कोठारी यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली. नूतन संचालक सदस्य तसेच विविध कमिटी प्रमुख आणि प्रांत स्तरावरील समिती सदस्यांचा सत्कार केला. रोटरी क्लब ऑफ ॲन्सच्या नूतन अध्यक्षा शर्मिला पाटील, सचिव वैशाली कोठारी यांचा सत्कार डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्याहस्ते केला.
प्रमुख उपस्थित डॉ. सौ. आवाडे, नूतन सहाय्यक प्रांतपाल राजेश कोडुलकर, मावळते सहाय्यक प्रांतपाल प्राचार्य डॉ.प्रशांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. महेश कांबळे यांनी संपादित केलेल्या ॲक्शन या बुलेटिनचे प्रकाशन झाले. महेंद्र मुथा, प्रकाश गौड यांसह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. स्वागत मावळते अध्यक्ष सत्यनारायण धूत यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय रविंद्र नाकील व शर्मिला पाटील यांनी केला. सूत्रसंचालन रविंद्र नाकिल व मनाली मुनोत यांनी केले. आभार पंकज कोठारी यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.