नाईट कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे उद्‍घाटन

नाईट कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे उद्‍घाटन

06840
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर आधारित भित्तिपत्रिकेचे उद्‍घाटन झाले.

नाईट कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे उद्‍घाटन
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे उद्‍घाटन झाले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर आधारित भित्तिपत्रिकेचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरण समन्वयक डॉ. बी. यु. तुपे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० व त्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. आयोजन भित्तिपत्रिका विभागप्रमुख डॉ. प्रवीण पवार यांनी केले.
-----
डीकेएएससीत नवीन शिक्षण धोरण सप्ताह
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात नवीन शिक्षण धोरण सप्ताह लक्षवेधी ठरला. सप्ताहाची सांगता डॉ. मकरंद पैठणकर (औरंगाबाद) यांच्या आभासी व्याख्यानाने झाली. नव्या उच्च शिक्षण धोरणातील शासन-विधी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. सप्ताहाचे उद्‍घाटन डॉ. प्रभाकर निसर्गंध यांच्या व्याख्यानाने झाले. सप्ताहात डॉ. आतिश पाटील, डॉ. रितू रॉड्रिग्ज, प्रा. अक्षय स्वामी, प्रा. चेतन पाटील यांची व्याख्याने झाली. इतर शिक्षण संस्थांमध्येही विषयतज्ज्ञ म्हणून या कालावधीत प्राध्यापकांनी व्याख्याने दिली. शिवाजी विद्यापीठाच्या शिव-वार्ता संवाद आभासी थेट प्रक्षेपित कार्यक्रमात महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, समन्वयक डॉ. अर्जुन जाधव, डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. डी. ए. यादव, गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. विनायक गानबावले यांचे सहकार्य लाभले.
----
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह उत्साहात झाला. या सप्ताहाअंतर्गत विद्यार्थी, प्राध्यापक, पालक यांच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाविषयी जनजागृती व्हावी व त्याची रूपरेषा, महत्त्व व फायदे प्रत्येक समाज घटकांपर्यंत पोहचावेत यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. याअंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागातर्फे प्रा. सचिन जाधव यांचे व्याख्यान झाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून नाईट कॉलेजमधील भूगोल विभाग व दत्ताजीराव कदम महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच नाईट कॉलेजमधील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्र सेवा दल, इचलकरंजी यांच्यातही सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. पी. डी. नारे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com