नागराजाच्या मुर्तीचे सुहासिनींकडून पूजन

नागराजाच्या मुर्तीचे सुहासिनींकडून पूजन

07001
इचलकरंजी : १) नागपंचमीनिमित्त ग्रामीण भागात मानाच्या कुंभारांनी मोठ्या मातीच्या नागाची प्रतिकृती डोक्यावर घेवून मिरवणूक काढली.
07000
२) दि न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये झिम्मा फुगड्या व पिंगा या पारंपारिक खेळांचे सादरीकरण केले.
------------------
नागराजाच्या मुर्तीचे सुहासिनींकडून पूजन
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात नागपंचमी उत्साहात ः फुगड्या, झोपाळ्याचा लुटला आनंद
इचलकरंजी, ता. २१ : शहरासह शिरोळ, हातकणंगले तालुक्यात सोमवारी उत्साहात नागपंचमी साजरी केली. विविध ठिकाणी नागराजाच्या मूर्तीचे सुहासिनींनी विधिवत पूजन केले.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारीच नागपंचमी आल्याने सणाला विशेष महत्व आले. सकाळपासून शहरातील नाग मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. फुगड्यांचा फेर धरत आणि झोपाळ्याचा आनंद लुटला. शाळा, महाविद्यालयातील सांस्कृतिकसह जनजागृती कार्यक्रम घेतले. नागपंचमीच्या निमित्ताने शहरात नाभिक समाज बांधवांनी व्यवसाय बंद ठेवले होते.
श्रावणातील पहिल्या सोमवारी नागपंचमी असल्याने शहरातील नाग मंदिरासह महादेव, शिवमंदिरांसमोर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. गावभागातील नागराया गणेश मंदिरात दिवसभर भाविकांची वर्दळ होती. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नागदेवतेचे दर्शन घेतले. शहरालगत ग्रामीण भागात मोठ्या मातीच्या नागाची सवाद्य मिरवणूक काढली. झाडाला बांधलेल्या झोपाळ्याचा आनंद लुटण्यासाठी महिलांची चढाओढ लागली होती. सायंकाळीही मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. कुंभार बांधवांनी केलेल्या मातीच्या नागाच्या प्रतिकृतींना मोठी मागणी होती. श्रावणतील नागपंचमी हा पहिलाच सण. त्यातच श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी सण एकाच दिवशी येण्याचा योगायोग जुळून आला. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह दिसून येत होता.
*दि न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी नागपंचमीचे वर्णन करणारी गाणी सादर केली. झिम्मा फुगड्या व पिंगा या पारंपारिक खेळांचे सादरीकरण केले. महाराष्ट्रीयन पारंपारिक सण उत्सवातील संस्कारांची जपणूक व्हावी या उद्देशाने मुख्याध्यापक बी. ए. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमी साजरी केली.
*वडगाव नागनाथ मंदिरात कार्यक्रम
पेठवडगाव : नागपंचमीनिमित्त येथील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. मंदिरात धार्मिक विधी, अभिषेक, मुर्तीची मिरवणूक व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम झाले. येथील नागोबावाडी येथे शंभर वर्षे जुने नागनाथ मंदिर आहे. या मंदिराच्या पुजेचा मान नाभिक समाजास पारंपारीक पध्दतीने दिला जातो. या समाजातील प्रमुख मंडळी पहाटे अभिषेक व मुर्तीची पुजा, धार्मिक विधी करतात.त्यानंतर उत्सवमुर्तीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली जाते. पुजेचे मानकरी शरद काशिद, अशोक काशिद, भिकाजी काशिद यांनी धार्मिक विधी केले. आरती, नैवेद्य माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्याहस्ते झाला. न्यु सन्मित्र तरुण मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते.
-------------------
इचलकरंजी रेस्क्यू टीमकडून जनजागृती
टीमच्या सदस्यांनी जयसिंगपूर येथील नवजीवन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, यशवंत विद्यालय येथे जनजागृती मार्गदर्शन केले. साप चावल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत जागृती केली. सापाची ओळख व सर्पदंश होऊ नये याबद्दल माहिती दिली. साप वस्तीमध्ये आढळल्यास वनविभागाच्या १९२६ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन केले. महेश सूर्यवंशी, रमन आमने, सुहास जुवेकर,अतुल शेलार, समर्थ घोरपडे आदी उपस्थित होते. दरम्यान दि न्यू हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबच्या सहकार्याने वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रम झाला. चंद्रकांत बागडी यांनी विषारी, बिनविषारी, न विषारी सापाचे विविध प्रकार, रचना, वैशिष्ट्ये, समज, गैरसमज याबाबत माहिती दिली. नागपंचमी साजरी न करता सर्पंपंचमी साजरी करावी असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com