गणपती महायज्ञ

गणपती महायज्ञ

07886
जीवनाच्या उद्धारासाठी
भागवत ग्रंथ अभ्यासा

विद्यानृसिंह भारती : इचलकरंजीत गणेश महायज्ञ सोहळ्यास भेट

इचलकरंजी, ता. ६ : महायज्ञ केवळ भक्तीचा मार्ग नसून ज्ञानमय आणि धर्ममय ग्रंथ प्राप्त करण्याचा मार्ग आहे. भक्तीमुळे मन शुद्ध झाले की ज्ञान उत्तमरीत्या आत्मसात करता येते. यातून परमात्म्याचे ज्ञान झाले की मोक्षाचा मार्गदेखील गवसतो. जीवनाचा उद्धार करण्यासाठी भागवत ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास करावा. तरच ग्रंथाचा खरा अर्थ समजेल, असे आशीर्वचन करवीर पीठाचे श्री जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले.
सहाव्या दिवशी जगद्‌गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी यांनी आज १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला भेट दिली. राजस्थानचे परपूज्य संत श्री श्री १०८ सीतारामदासही यांच्यासह साधु संतमहंतांसह जगदगुरु शंकराचार्य यांच्या भेटीने आज दुग्धशर्करा योग पाहायला मिळाला. सकाळी वरदविनायकाच्या साक्षीने श्री जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या पद्मचरण पाद्यपूजन श्री. व सौ बाळासाहेब ओझा दांपत्याचे हस्ते झाले. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गणपती महापुराण कथा व नानीबाई का मायरा या संगीतमय कार्यक्रमाचा समारोप झाला.
अखेरच्या दिवशी संगीत कैलासचंद्रजी जोशी व पंडित अक्षयजी गौड यांनी कथा आणि संगीतातून भक्तीमार्गावर चालण्याचा मूलमंत्र दिला. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच गणपती महायज्ञ होत असल्याने परजिल्हासह विविध भागाभागातून पंचगंगा काठावर भक्तांचा मेळाच भरला आहे. उद्या सोहळ्यातील पहिला रविवार असल्याने गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने संयोजन समितीने तयारी केली आहे. रविवारपासून श्रीमद भगवदगीता अठरा अध्याय, ज्ञानचर्चा आणि सनातन संस्थेच्यावतीने विशेष प्रवचन कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सायंकाळी भव्य पंचगंगा दीपमहोत्सव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com