गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी पहाट गाणी

गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी पहाट गाणी

गुढीपाडव्यानिमित्त
मंगळवारी पहाट गाणी
इचलकरंजी : श्री बालाजी उद्योग समूहातर्फे गुढीपाडव्यानिमित्त पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी (ता. ९) पहाटे पाच वाजता सुरू होणार आहे. गायक आणि संगीतकार अजित परब, गायक अभिषेक तेलंग, गायिका सुगंधा दाते, निवेदिका अनुश्री फडणवीस-देशपांडे, संगीत संयोजक प्रणव हरिदास यांचा सहभाग असणार आहे. उपस्थित रसिकांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेऊन लहान व मोठ्या गटांत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
------
स्टडी लायब्ररी
अंतर्गत पुस्तके
इचलकरंजी : मनोरंजन मंडळ आणि श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फौंडेशन यांच्यातर्फे स्टडी लायब्ररी उपक्रमांतर्गत बारावी प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, बारावीनंतरच्या जेईई, नीट, सीईटी, लॉ आदी सर्व प्रकारच्या प्रवेश परीक्षांसाठी लागणारी विविध प्रकाशनांची पुस्तके उपलब्ध आहेत. एमपीएससी आणि यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा, पोलिस भरती, लिपिक भरती अशा स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी विविध पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. अल्प वार्षिक फीमध्ये ही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतात. फक्त विद्यार्थिनींसाठी मर्यादित अभ्यासिका सेवाही उपलब्ध आहेत. संस्थेच्या सुंदर बागेजवळच्या दाते मळा येथील इमारतीमध्ये स्टडी लायब्ररी असून सकाळी दहा ते एक आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
--------------
मतदान जनजागृती
दौड रविवारी
इचलकरंजी : स्वीप समितीच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती दौड होणार आहे. रविवारी (ता. ७) सकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थ ते राजवाडा चौक आणि राजवाडा चौक ते परत शिवतीर्थ अशी तीन किलोमीटर दौड होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या नोडल अधिकारी आरती खोत-पाटील यांनी केले आहे.
-----
पालकांसाठी
मार्गदर्शन कार्यक्रम
इचलकरंजी : रवी ॲकॅडमीतर्फे पालकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सुजाण पालकत्व या विषयावर ख्यातमान वक्ते इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम श्री शांतिनाथ एज्युकेशन सोसायटी रिंग रोड येथे रविवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. याचा पालक, विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रा. रेवगोंडा पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com