‘स्वामी समर्थ’तर्फे भजन सेवा

‘स्वामी समर्थ’तर्फे भजन सेवा

‘स्वामी समर्थ’तर्फे
भजन सेवा
इचलकरंजी : श्री स्वामी समर्थ महिला मंडळातर्फे भजन सेवा झाली. येथील चमत्कारी मारुती मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त भजन सेवा झाली. यामध्ये भजनी मंडळ प्रमुख विमल काटकर, सदस्य जया चिखलीकर, वर्षा देशपांडे, दीपाली म्हेतर, रोहिणी पाटील आदी महिलांनी गीतगायन केले. यासाठी संगीत प्रशिक्षक हार्मोनियम वादक व गायक सागर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तबला साथ सुधीर कुलकर्णी, ढोलकी साथ सुरेश जाधव, मनीषा गाडवे, प्रतिभा वझे यांचे सहकार्य मिळाले.
-----
‘राजे बहुउद्देशीय’तर्फे
पाणपोईची सुविधा
इचलकरंजी : येथील राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे अपर तहसील कार्यालयाजवळ पानपोईची सुविधा केली. त्याचा प्रारंभ अपर तहसीलदार सुनील शेरखाने, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे, संस्थेचे अध्यक्ष विनायक बुबनाळे यांच्या उपस्थितीत झाला. संस्थेतर्फे अकरा वर्षांपासून सुरू असणारे सामाजिक उपक्रम कौतुकस्पद असल्याचे अपर तहसीलदार श्री. शेरखाने यांनी सांगितले. ऋषभ कांबळे, अजित शेट्टी, गणेश आवळे, सुहास बुबनाळे आदी उपस्थित होते.
---
इचलकरंजी हायस्कूलमध्ये
मतदानविषयक जनजागृती
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मतदानविषयक जनजागृती केली. तसेच प्रभात फेरीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात मतदानाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका व्ही. एच. उपाध्ये, डी. वाय. कांबळे आदींनी मतदानाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या.
----
‘आपटे वाचन’तर्फे
वसंत व्याख्यानमाला
इचलकरंजी : शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिरातर्फे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे ५२ वे वर्ष आहे. २ ते ९ मे या कालावधीत व्याख्यानमाला राजवाडा चौक डीकेटीई पटांगण येथे सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक हे संविधानाच्या अमृतमहोत्सवात नागरिकांची कर्तव्य, त्यापुढे प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे तमाशा आणि वारी याबाबत अनुभवकथन, मुक्ता पुणतांबेकर यांचा प्रवास व्यसनमुक्तीचा यावर संवाद, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी हे संविधानाची वाटचाल आणि न्यायालयाची भूमिका, आनंद क्षेमकल्याणी, संजय चौधरी या प्रतिभावंत कवींचा चांदनगाथा हा कार्यक्रम, डॉ. सागर देशपांडे यांचे आदर्शांच्या शोधात, सचिन शिरगावकर यांचे भारतीय उद्योगाचे भवितव्य आणि त्यातील कोल्हापूरचे स्थान आणि शेवटच्या दिवशी रत्नाकर आठवणी रत्नाक्षर आठवणी रत्नाकर मतकरींचा हा कार्यक्रम प्रतिभा मतकरी, सुप्रिया विनोद, गणेश मतकरी सादर करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com