‘स्वामी समर्थ’तर्फे भजन सेवा

‘स्वामी समर्थ’तर्फे भजन सेवा

‘स्वामी समर्थ’तर्फे
भजन सेवा
इचलकरंजी : श्री स्वामी समर्थ महिला मंडळातर्फे भजन सेवा झाली. येथील चमत्कारी मारुती मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त भजन सेवा झाली. यामध्ये भजनी मंडळ प्रमुख विमल काटकर, सदस्य जया चिखलीकर, वर्षा देशपांडे, दीपाली म्हेतर, रोहिणी पाटील आदी महिलांनी गीतगायन केले. यासाठी संगीत प्रशिक्षक हार्मोनियम वादक व गायक सागर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तबला साथ सुधीर कुलकर्णी, ढोलकी साथ सुरेश जाधव, मनीषा गाडवे, प्रतिभा वझे यांचे सहकार्य मिळाले.
-----
‘राजे बहुउद्देशीय’तर्फे
पाणपोईची सुविधा
इचलकरंजी : येथील राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे अपर तहसील कार्यालयाजवळ पानपोईची सुविधा केली. त्याचा प्रारंभ अपर तहसीलदार सुनील शेरखाने, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे, संस्थेचे अध्यक्ष विनायक बुबनाळे यांच्या उपस्थितीत झाला. संस्थेतर्फे अकरा वर्षांपासून सुरू असणारे सामाजिक उपक्रम कौतुकस्पद असल्याचे अपर तहसीलदार श्री. शेरखाने यांनी सांगितले. ऋषभ कांबळे, अजित शेट्टी, गणेश आवळे, सुहास बुबनाळे आदी उपस्थित होते.
---
इचलकरंजी हायस्कूलमध्ये
मतदानविषयक जनजागृती
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मतदानविषयक जनजागृती केली. तसेच प्रभात फेरीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात मतदानाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका व्ही. एच. उपाध्ये, डी. वाय. कांबळे आदींनी मतदानाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या.
----
मराठी मीडियम
हायस्कूल प्रथम
इचलकरंजी : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील जिल्हास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये १४ व १७ वर्षाखालील मुले-मुली दोन्ही गटांमध्ये डीकेटीई सोसायटीच्या मराठी मीडियम हायस्कूल नारायण मळा प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर एक लाख ६७ हजार रुपये प्रोत्साहनपर शासकीय अनुदानही मिळवले आहे. प्रोत्साहनपर अनुदान दोन्ही गटांमध्ये मिळवणारी इचलकरंजी शहरातील पहिलीच शाळा आहे. यशाबद्दल डीकेटीई सोसायटीचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, डॉ. राहुल आवाडे, संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, संचालक रवि आवाडे, राजू कुडचे, शेखर शहा, सर्जेराव पाटील, भूपाल कागवाडे, स्वानंद कुलकर्णी, जयपाल हेरलगे आदींनी मराठी मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. एच. गाडेकर, क्रीडा शिक्षक व विभागप्रमुख संभाजी बंडगर, कार्तिक बचाटे, बजरंग निर्मळ आदींचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com