गुजरी कॉर्नर चौकात खड्डेच खड्डे

गुजरी कॉर्नर चौकात खड्डेच खड्डे

08578
इचलकरंजी : गुजरी कॉर्नर चौक मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहनधारक खड्डा चुकवून बाजूने जात आहेत.
----------
गुजरी कॉर्नर चौकात खड्डेच खड्डे
अपघात नित्याचेच ः इचलकरंजीत चुकवताना वाहनधारकांची कसरत
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : गुजरी कॉर्नर चौक रस्त्यावरील खड्ड्यांत अक्षरशः गुरफुटून गेला आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे जैसे थे असून खड्ड्यांमध्ये येणारी जाणारी वाहने अक्षरश: आपटत आहेत. लगतच्या खड्ड्यांना वळसा घालून सुरक्षित वाट शोधत वाहन काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येक वेळी केवळ खड्ड्यांत मुरूम टाकून खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र पुन्हा खड्डे उघड्यावर पडत आहेत.
शहरात रस्त्यांची कामे पूर्ण होताना राजवाडा चौक ते नदीवेस चौक रस्त्यावरील खड्डे मात्र दुर्लक्षित होत आहेत. दरम्यान, गुजरी कॉर्नर चौक अपघाताचा ब्लॅक स्पॉट झाला आहे. ठराविक अंतरावर येणारे आणि एकाच ठिकाणी असणारे हे खड्डे धोकादायक ठरत आहेत. वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात नित्याचेच बनले आहेत. रस्ता चांगला दिसत असल्याने वाहनचालक वेगाने जातात. पुढे मात्र खड्डा समोर दिसताच जोराने ब्रेक दाबतात किंवा खड्ड्यांतून गाडी नेतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रात्री जीव मुठीत धरून वाहनधारकांना मार्गस्थ व्हावे लागते.
कर्नाटक राज्याला जोडणारा शहरातून जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यावरील खड्ड्यांवरील समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी कायम आहे. अनेक वेळा भागातील नागरिक, व्यावसायिकांवर स्वतःच खड्डे बुजवण्याची वेळ येत आहे. या मार्गावर मागील दोन वर्षांत दोन ते तीन वेळा नव्याने रस्ते करण्यात आले. तरीही खड्डे बुजवून डांबरीकरण न करता खड्डे तसेच राहिले आहेत. याचा मनस्ताप वाहनधारकांना सोसावा लागत आहे.
-------------
नागरिक, व्यावसायिक सांगतात
गुजरी कॉर्नर मार्गावर ज्या ठिकाणी खड्डे आहेत तेथे लिकेजचा प्रश्न कायम आहे. वारंवार लिकेज होत असल्यामुळे खड्डे खणले जात आहेत. त्यामुळे खड्ड्यांचा आकार वाढतच आहे. लिकेज झाल्यास तात्पुरती डागडुजी केली जाते. लिकेज झाल्यास त्यांचा ठावठिकाणा लागावा म्हणून ठिकठिकाणी खड्डे कायम ठेवले आहेत; मात्र हेच खड्डे धोकादायक ठरत असल्याचे भागातील नागरिक, व्यवसायिकांनी सांगितले.
------
गेली दोन वर्षे खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडे मागणी करत आहे. निवेदनासह अधिकाऱ्यांना समोरासमोर भेटूनही लक्ष दिले जात नाही. खड्ड्यांमुळे होणारे अपघात समोर दिसत आहेत. सतत होणाऱ्या लिकेजमुळे खड्ड्यांचा आकार वाढतच आहे.
-महादेव नागुरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com