कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परीणाम

कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परीणाम

08585
इचलकरंजी : १) बाजारात भाज्यांची आवक कमी झाली असून विक्रेत्यांकडे तुटवडा आहे.
08586
२) आंब्याची आवक वाढल्याने शहरात पथ विक्रेत्यांची संख्या वाढली आहे.
------
कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परीणाम
परजिल्हा, परराज्यावर बाजार समिती अवलंबून : बीन्सच्या दरात दु‍पटीने वाढ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : कडक उन्हाची लहर आता पालेभाज्यांवर प्रखरपणे दिसू लागली आहे. यासाठी परजिल्हा, परराज्यांवर बाजार समिती अवलंबून आहे. कोथिंबीर, मेथीची आवक फारच मंदावली असून, मेथीचा तुटवडा आहे. अन्य भाज्यांचे दरही चढे आहेत. टोमॅटोचे दर काहीसे वाढू लागले आहेत. मात्र, चांगल्या प्रतीचा माल कमी आहे. बीन्सचे दरही दुपटीने वाढले आहेत.
लग्नसमारंभामुळे मागणी आणि आवकेनुसार भाजीपाल्याला दर मिळत आहेत. कोबी, वांगी, मिरची, काकडीला मागणी जोमात आहे. फूल बाजारात दिवसाला भाव बदलत आहेत. फूल आणि त्यापासून बनवलेल्या बुकेंना ग्राहकांतून चांगली मागणी आहे. फळबाजारात आंब्यांची आवक पुन्हा वाढली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंबे विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. मागणी असताना कलिंगडाची आवक कमी होत आहे. त्यामुळे कलिंगडचा गारवा काहिसा महागला आहे. खाद्यतेलाचे भाव अस्थिर होत असून, दर सतत कमी जास्त होत आहेत.
प्रति किलो रुपये भाजीपाला : टोमॅटो - १५ ते २०, दोडका - ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली - ४० ते ५०, ढोबळी मिरची - ६० ते ८०, मिरची - ८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी - २० ते २५, बटाटा - २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण - १८० ते २००, आले - १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ६०० शेकडा, गाजर - ३० ते ४०, बीन्स - २५० ते ३००, गवार - ८० ते १००, वरणा शेंगा - ६० ते ८०, भेंडी - ५० ते ६०, काकडी - ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - १५ते २०, कोथिंबीर, मेथी (पेंढी) - २५ ते ३०, शेवगा - २ ते ३ रुपये नग.
- - --- - - -
फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १५० ते २००, गुलाब - २५० ते ३००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती -१८० ते २००.
- - -- - -
फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी - १०० ते १२०, डाळिंब - १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरू - ५० ते ८०, खजूर - १५० ते २००, पपई - ४० ते ५०, मोर आवळा - १०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज - ४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच - १०० ते १४०, अननस - ४० ते ५०, अंजीर - ८०-१००.
-- -
खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२ .
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी - ३१ ते ३७, बार्शी शाळू - ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७८ ते ८३, तुरडाळ - १५५ ते १६५, मुगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा - ७०, मूग - १०० ते ११०, मटकी - १०० ते ११०, मसूर - ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी - ८८, हिरवा वाटाणा - ९०, छोला - १४० ते १६०.
--------
विदेशी कोंथिबीर बाजारात
उन्हाळ्यात पालेभाज्यांची स्थानिक आवक मंदावते तेव्हा बाहेरची आवक सुरू होते. यामध्ये कोथिंबिरीची आवक अधिक असते. भर उन्हात कोंथिबीर उत्पादन घेणे कठीण असताना बाजारात मात्र आवक दिसत आहे. अशावेळी ही कोथिंबीर विदेशी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. देशी उत्पादन कमी झाल्याने शेतकरी विदेशीवर भर देतात.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com