अपघात ठार जखमी

अपघात ठार जखमी

08672
यड्राव : अपघातात चारचाकी वाहन उलटल्‍याने रस्त्याकडेला ओघळीत पडून चक्काचूर झाले.
...
चारचाकी उलटल्याने यड्राव येथे वृद्धा ठार
भीषण अपघातात चार बालकांसह १० जण जखमी
इचलकरंजी, ता. १३ : विवाह समारंभासाठी जाणारे भरधाव चारचाकी वाहन उलटल्‍याने यड्राव (ता. शिरोळ) येथे भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील वृद्धेचा मृत्यू झाला. तर चार बालकांसह १० जण जखमी झाले. लालबी नबीसाब कलबुर्गी (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे.
अपघातातील सर्वजण तारदाळ (ता. हातकणंगले) येथील सनदी कुटुंबातील असून, सर्वजण नांदणी (ता. शिरोळ) येथे विवाह समारंभासाठी जात होते. ही घटना यड्राव-जांभळी मार्गावरील यड्राव ओढ्याजवळ आज दुपारी चार वाजण्याच्या समारास घडली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना सांगली येथील सिव्‍हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव रस्त्याच्या ओघळीत उडून उलटलेल्‍या चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तारदाळमधील संगमनगरात राहणाऱ्या‍ चार बालकांसह १० जण नियाज सत्तार सनदी चारचाकी वाहनातून विवाह समारंभासाठी नांदणी येथे जात होते. त्यांची गाडी नाईक-निंबाळकर सेवा सोसायटीसमोरील यड्राव येथील ओढ्याजवळ आली. दरम्यान, समोरून येणारे वाहन चुकवताना चालक नियाज यांना गाडीचा अचानक ब्रेक फेल झाल्याचे जाणवले. त्यांनी भरधाव असलेल्या गाडीचा हॅण्डब्रेक दाबला असता गाडी तीन-चार वेळा पलटी मारून रस्त्याकडेला ओघळीत पडली. यानंतर मोठा आवाज झाल्याने वाहनधारक जागीच थांबले.
अपघातात जकिया मल्लीक कलबुर्गी (वय ८), जैबा मल्लीक कलबुर्गी (वय ६), आसलम पैंगबार मुजावर (वय ८), अहमदअली उमर मुजावर (वय ६) या चार बालकांसह लालबी कुलबुर्गी, माजिया फारूक सौदागर (वय १६), स्वालिया फारूक सौदागर (वय १४), आयेशा उमय मुजावर (वय २८), आलिशा पैगंबर मुजावर (वय १३), हुसेनबी सत्तार सनदी (वय ४०) आदी जखमींना नागरिकांनी त्वरित आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठा रक्तस्त्राव झाल्याने लालबी कुलबुर्गी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यां‍नी सांगितले. अपघातात लहान मुलांच्या डोक्याला, हाताला, पायाला, गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सांगली रुग्णालयात हलवण्यात आले.
----
नागरिक धावले मदतीला
सनदी कुटुंबीय यापूर्वी यड्राव येथील रेणुकानगर भागात राहत होते. त्यामुळे त्यांना पाहताच त्यांची ओळख पटली. भागातील नागरिकांनी तत्परतेने पुढे येत त्यांना त्‍वरित उपचारासाठी दाखल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com