शिवतीर्थ चौकच बनले बसस्थानक

शिवतीर्थ चौकच बनले बसस्थानक

08697
इचलकरंजी : १) बसस्थानकात पूर्वेकडील भाग उखडून मुरुमीकरणाचे काम सुरू आहे.
08696
२) कर्नाटकच्या एसटी गाड्यांनी वाहतूक शाखेच्या बाजूला मुख्य मार्गावर बसथांबा केला आहे.
-----------
शिवतीर्थ चौकच बनले बसस्थानक
काँक्रिटीकरणामुळे बदलले बसथांबे ः गोंधळामुळे प्रवाशांची रस्त्यावरच वर्दळ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ : मध्यवर्ती बसस्थानकात काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने सर्व मार्गावरील बसथांबे बदलले आहेत. याबाबत आगार प्रशासनाने नियोजन केले असले तरी प्रवाशांचा गोंधळ उडत असून, बाहेर रस्त्यावरच प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. कर्नाटकच्या एसटी गाड्यांनी वाहतूक शाखेच्या बाजूला मुख्य मार्गावरच बसथांबा केला आहे. त्यामुळे शिवतीर्थ चौकाचीच मध्यवर्ती बसस्थानकासारखी स्थिती पाहायला मिळत आहे.
सध्या बसस्थानकाचा पूर्वेकडील भाग उखडून तेथे मुरुमीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्वेकडील सर्व फ्लाट बंद ठेवले आहेत. कोल्हापूरहून येणाऱ्या गाड्या शाहू पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळामार्गे बसस्थानकातील फलाट क्रमांक ६ वर येऊन नेहमीच्या मार्गाने रवाना होत आहेत. खिद्रापूर, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर, शिरढोण, तसेच मिरज, सांगली, कागल मार्गांवरील बसेस-शिवतीर्थजवळील प्रवेशद्वारातून आत येत दक्षिणेकडील बाजूला थांबून प्रवासी चढ-उतार करून पूर्वेकडून प्रवेशद्वारातून मार्गस्थ होताहेत. वडगाव मार्गावरून येणाऱ्या बसेस आऊट गेटमधून वडगाव फ्लाटवर लावून परत नेहमीच्या मार्गाने जात आहेत. गाड्या शिवतीर्थजवळील प्रवेशद्वारातून येत पूर्वेकडील प्रवेशद्वारातून बाहेर जात असल्याने येथे मोठी कोंडी होत आहे. वाहनांच्या पार्किंगची सुविधा असल्याने प्रवाशांना अधिक गैरसोयीचे बनत आहे.
अपुऱ्या जागेमुळे कर्नाटकच्या गाड्यांना आगाराने बसस्थानकाबाहेर पर्याय शोधण्यास सांगितले. इचलकरंजीतून कर्नाटकातील अनेक मार्गांवर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे त्यांनी सोय बघत शिवतीर्थ ते राजाराम स्टेडियम या मुख्य मार्गावर बसथांबा सुरू केला आहे. याबाबत त्यांनी वाहतूक शाखेला लेखी पत्र दिले, मात्र प्रवाशांना उन्हातान्हात त्रास सहन करावा लागत आहे. काँक्रिटीकरणाचे कामाला अनेक दिवस लागणार असल्याने आगार प्रशासनाला नियोजनातील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.
----
बदलाचे फलक नाहीत
फ्लाट बदललेले तसेच वनवे तून एकेरी वाहतूक आदी फलक आगाराने बसस्थानकात लावणे गरजेचे होते. फलक नसल्याने प्रवाशांचा संताप वाढला आहे. माहितीसाठी नियंत्रण कक्षात जावे लागत आहे. तसेच फ्लाट नसल्याने भरउन्हात एसटीची वाट पाहावी लागत आहे. उन्हात प्रवाशांना भोवळ येत आहे. त्यामुळे आगाराकडून तात्पुरत्या शेडच्या उभारणीची नितांत आवश्यकता आहे.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com