बालाजी माध्यमिक विद्यालय

बालाजी माध्यमिक विद्यालय

बालाजी माध्यमिक विद्यालय
इचलकरंजी : बारावी परीक्षेत बालाजी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेजने यश मिळवले. सायन्स विभागाचा ९९.७१ व कॉमर्स विभागाचा ९९.२८ टक्के निकाल लागला. अनुक्रमे सायन्स विभागात तन्वी जाधव ८४ टक्के, सूरज मुल्ला ८३.५०, समर्थ मांगलेकर ८३.१७, तर कॉमर्स विभागात साक्षी पाटील ८९.३३, शैलजा कलढोणे ८९, सानिया अरबने ८५ टक्के गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक मदन कारंडे, मुख्याध्यापिका एम. एस. रावळ, मुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर यांच्या हस्ते झाला.
---
इचलकरंजी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज
इचलकरंजी : बारावी परीक्षेत इचलकरंजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला. सायन्स विभागात ९१.३३ टक्के गुण मिळवून काव्यांजली नागुरे ही विद्यार्थिनी पहिली आली. गणित विषयात १०० पैकी १०० गुण एका विद्यार्थ्याला, तर आयटी विषयात तीन विद्यार्थ्यांना गुण मिळाले. ९० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. विद्यार्थ्यांना प्राचार्या श्रीमती व्ही. एच. उपाध्ये, डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
--
दि न्यू हायस्कूल
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने बारावी परीक्षेत यश मिळवले. सायन्स विभागाचा १००, कॉमर्स ८४, तर आर्टसचा ६६ टक्के निकाल लागला. अनुक्रमे सायन्स विभागात रेवती भोसले ९०, कॉमर्स विभागात सरिता गुंजेगावकर ६६.३३, आर्टस् विभागात स्वप्नील भोसले याने ६८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अरुण खंजिरे, मुख्याध्यापक बी. ए. कोळी आदींचे मार्गदर्शन लाभले.
-----
गॅलेक्सी स्कूल, ज्युनिअर कॉलेज
इचलकरंजी : बारावी परीक्षेत गॅलेक्सी स्कूल व ज्युनिअर कॉलेजने यश मिळवले. विज्ञान शाखेचा निकाल ९८.९३ टक्के लागला. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मेघा बेलेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
-----
बिशप इंग्लिश स्कूल
इचलकरंजी : बिशप इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयात अनुक्रमे सना शेख ७७.५, आसिम शेख ७४.६७, आफरीन पटेल हिने ७४.१६ टक्के गुण मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांना चौकट करिअर पॉईंटचे अध्यक्ष कैश बागवान, इम्तियाज म्हैशाळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
----
तु‌काराम दत्ताजी पवार ज्युनिअर कॉलेज
कोवाड : कालकुंद्री (ता. चंदगड) येथील लोकनेते तु‌काराम दत्ताजी पवार ज्युनिअर कॉलेजने बारावी परीक्षेत यश मिळवले. यामध्ये कला शाखेचा ८१.५७ व विज्ञान शाखेचा ९८.७८ टक्के निकाल लागला. कला शाखेत सुलभा सुरुतकरने ८३ टक्के गुण प्राप्त करून कोवाड केंद्रात पहिला क्रमांक मिळवला. अश्विनी पाटीलने ६९.८३, तर गीता होडगेने ५५ टक्के गुण मिळवून अनुक्रमे विद्यालयात यश प्राप्त केले. विज्ञान शाखेत एकनाथ मनवाडकर (६७.३३), विवेक पाटील (६७) व अर्पिता कोकितकर (६३.५०) यांनी अनुक्रमे यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य सुभाष बेळगांवकर व शिक्षकांनी अभिनंदन केले.
------------
महात्मा फुले-ज्युनिअर कॉलेज
महागाव ः येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश संपादन केले. वाणिज्य शाखेचा १००, तर कला शाखेचा ९७.८० टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेतून अनुक्रमे सरस्वती दंडवते (८१ टक्के), पूनम नाईक (८०.६७), तनुजा पाटील (८०.५०), कला शाखेतून वैष्णवी पाटील (६४), वैष्णवी दिवटे (६१.५०), तेजस्विनी कांबळे (६०.५०) यांनी अनुक्रमे गुण मिळवले. विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस. पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा. डी. एस. पाटील आदींनी अभिनंदन केले.
------------
02088
मधुरा गावडे, शुभांगी गुडूळकर, वनिता गावडे
कोवाड : अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. मधुरा गावडे हिने ८१.६७ टक्के गुण मिळवून चंदगड केंद्रात कला शाखेत प्रथम व तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शुभांगी तानाजी गुडूळकर (७१.५०), तसेच वनिता संजय गावडे (७१) यांनी अनुक्रमे यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, प्रा. एम. पी. पाटील, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. आर. एम. बिर्जे, प्रा. आय. वाय. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------
छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज
नेसरी : येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश संपादन केले. कला शाखेचा ९६.३४, वाणिज्य शाखेचा ९९.०४, तर विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला. कला शाखेत सानिका कांबळे हिने ८० टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम, तर काशिनाथ कांबळे ७७.८३, दीपाली कांबळे ७६, प्रणाली घाटोंबे ७६, कार्तिक बुगडे ७३.३३, तर अश्विनी कांबळे हिने ७२.१७ टक्के गुण मिळवले. वाणिज्य शाखेमध्ये नंदिनी बसान ८९.१७ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली. नंदिनी मोरे ८३.८३, सानिया मुळीक ८२.५०, समृद्धी लिपनाळे ८१.३३, तर सुफिया शिंदाने ७९.३३ टक्के गुण मिळवून केंद्रात अनुक्रमे आले. विज्ञान शाखेमध्ये प्रिया जोशी ८८.६७ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली. दिक्षिता पाटील ८०.५०, सानिका कोळी ७९.६७, ऋतू भारती ७९, तर सेजल पालकर ७७.८३ टक्के गुण मिळवून केंद्रात अनुक्रमे आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष अॅड. हेमंत कोलेकर, संस्था सचिव डॉ. अर्चना कोलेकर, प्राचार्य ए. डी. लोहार आदींचे मार्गदर्शन लाभले.
-------
न्यू इंग्लिश स्कूल-ज्युनिअर कॉलेज
नूल ः नूल (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. अनुक्रमे विज्ञान शाखेत सुमित चितारी (८०.८३ टक्के), गौरी टोणपी (७३.६७), सानिका बोरगली (७२.००,) वाणिज्य शाखेत कविता रवंदी (८३.३३), अश्विनी देसाई (७८.३३), वैष्णवी मुळीक (७५.८३) अनुक्रमे आले. कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. सावित्री परीट (७४. ८३), श्रावणी चव्हाण (७२), कोमल दिवटी (६८.५०) अनुक्रमे आले. विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, सचिव नानाप्पा माळगी आदींनी अभिनंदन केले.
---------------
GAD234.JPG ः
85405
स्वरूप पाटील, सुप्रिया देसाई, अद्वैत चव्हाण

साधना ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स
गडहिंग्लज ः येथील साधना ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वरूप पाटील याने ९२.३३ टक्के गुण घेऊन कॉलेजमध्ये प्रथम, तर गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत द्वितीय क्रमांक पटकावला. अनुक्रमे सुप्रिया देसाई हिने ८७.५०, तर अद्वैत चव्हाणने ८६.६७ टक्के गुण मिळवले. सचिव जे. बी. बारदेस्कर, साधनाचे प्राचार्य रफिक पटेल यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. संचालक अरविंद बारदेस्कर, संचालिका फिलॉन बारदेस्कर, कॉमर्स विभागप्रमुख भिउंगडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com