महिला पोलिस ठिय्या

महिला पोलिस ठिय्या

08797
इचलकरंजी : शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दुपारी आलेल्या महिला रात्री आठ वाजेपर्यंत पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच बसून होत्या.
...
शिवाजीनगर ठाण्यासमोर महिलांचा ठिय्या
मायक्रो फायनान्सचा तगादा ः साडेसात तासांनंतर घेतली तक्रार

इचलकरंजी, ता. २९ : राज्यात सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याचा बहुमान मिळवलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आलेल्या महिलांची तब्बल साडेसात तासांनंतर तक्रार घेण्यात आली. कबनूर (ता. हातकणंगले) परिसरातील मायक्रो फायनान्स कंपन्यातील एजंटांच्या वसुलीच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी आवारातच रात्री आठ वाजेपर्यंत ठिय्या मारला होता. अखेर पोलिसांनी संशयित एजंटांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर महिला शांत झाल्या; मात्र पोलिस ठाण्यात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कबनूर येथील दत्तनगर परिसरात फायनान्स कंपन्यांनी नेमलेल्या एजंटांकडून वारंवार वसुलीचा तगादा लावत महिलांना त्रास दिला जात आहे. याबाबत या महिलांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यासह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षकांकडेही काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. तरीदेखील एजंट महिलांकडून महिलांना धमकी दिली जात होती. आज बुधवारी (ता. २९) त्यांनी वसुलीसाठी टोकाची भूमिका घेतल्यानंतर संबंधित महिला कारवाई करण्याच्या मागणीसाठी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आल्या; मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने महिलांनी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला. त्यानंतर पाहता पाहता ५० हून अधिक महिला जमल्या.
भर उन्हात पुढे चार तास या महिला त्याच ठिकाणी होत्या. त्यानंतर पोलिसांनी फायनान्स कंपन्यांतील वसुली एजंट महिलांना बोलावून घेतले. दोन्ही महिला गट समोर आल्याने शाब्दिक वादावादी झाली. ठाणे अंमलदारांच्या खोलीतही महिला आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण बनले होते. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद यांनी दोन्हींकडील महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. महिलांची समजूत काढत तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले. गुन्हा दाखल होईपर्यंत महिला पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच रात्री आठपर्यंत बसून राहिल्या. दाखल गुन्ह्याची एफआयआर प्रत घेऊन महिला घरी परतल्या.
...
त्यांना खुर्च्या, आम्ही उन्हात...
‘फायनान्स कंपन्यांनी नेमलेल्या महिला एजंट पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची वेगळ्या पद्धतीने खातरजमा केली. स्वतंत्र खोलीत सर्वांना बसायला खुर्ची देत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र चिमुकल्या मुलांसह घरातून आलेल्या आम्हा महिलांना भर उन्हात दिवसभर बसवले,’ असा संताप महिलांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com