संविधान परिवाराकडून सहवास कट्टे हिरवे

संविधान परिवाराकडून सहवास कट्टे हिरवे

लोगो ः सकाळ इंपॅक्ट
---------
08826
इचलकरंजी : संविधान परिवाराने ‘सहवास कट्टे’ पुन्हा हिरवे करण्यासाठी हाती मोहीम घेत कार्यकर्त्यांनी अनेक ‘सहवास कट्ट्यां’च्या बाजूला वृक्षारोपण केले.
-----------------
संविधान परिवाराकडून ‘सहवास कट्टे’ हिरवे
कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण ः नागरिकांनी बसण्यायोग्य करणे आवश्‍यक
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : काही दिवसांपूर्वी शहरातील ‘सहवास कट्ट्यां’च्या दुर्दशेवर प्रकाशझोत टाकत ‘सकाळ’मधून ‘सहवास कट्ट्यांचा हिरावला सहवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते. याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही. मात्र त्याला प्रतिसाद देत संविधान परिवाराने ‘सहवास कट्टे’ पुन्हा हिरवे करण्यासाठी मोहीम हाती घेतली. परिवाराच्या कार्यकर्त्यांनी ‘सहवास कट्ट्यां’चे हिरावलेले हिरवेगार सौंदर्य बहरण्यासाठी वृक्षारोपण केले.
जेव्हा लोकप्रतिनिधी लोकहितकारी उपक्रम राबवतात, तेव्हा त्याचे जतन करण्याचे काम नागरिकांचे असते. याच भावनेतून सातत्याने संवैधानिक मूल्यांच्या जनजागराचे काम करणाऱ्या संविधान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी ‘सहवास कट्ट्यां’च्या आसपास झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शहर परिसरातील ‘सहवास कट्टे’ आणि त्यांची दुरवस्था याबाबत केवळ चर्चा न करता त्याला परत सुंदर करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील संविधान परिवार पुढे आला आहे.
जागतिक पर्यावरण दिन आणि साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त १२५ रोपे लावून जगवण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
वृक्षारोपणासह ‘सहवास कट्टे’ स्वच्छ करून बसण्यायोग्य करण्याची ही मोहीम नागरिकांनी उत्स्फूर्तपणे करायला हवी, असे मत संविधान परिवाराचे समन्वयक संजय रेंदाळकर यांनी व्यक्त केले. या कामासाठी वृक्षमित्र नीलेश बनगे, रोहित दळवी, अशोक वरुटे, वैभवी आढाव, रूचिता पाटील, दामोदर कोळी, साद चांदकोटी, ओम कोष्टी, अमित कोवे, प्रणिता पाटील, देवदत्त कुंभार, मुस्तफा शिकलगार, अमोल पाटील आदींनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com