वसतिगृहात प्रवेश सुरू

वसतिगृहात प्रवेश सुरू

वसतिगृहात
प्रवेश सुरू
इचलकरंजी : महात्मा ज्योतिराव फुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू झाले आहेत. पंचगंगा कारखान्यासमोर गंगानगर येथे असणाऱ्या वसतिगृहात पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्ग, तसेच आर्थिक मागास, एसबीसी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातात. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---
संविधान संवाद
निवासी शिबिर
इचलकरंजी : लोकराजा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त चला संविधान समजून घेऊया, या संविधान संवाद निवासी शिबिराचे आयोजन केले आहे. संविधान संवाद समिती कोल्हापूर जिल्हा यांच्यातर्फे हे शिबिर राधानगरी येथील हत्तीमहाल येथे होणार आहे. १५ व १६ जूनदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे. लोकराजा शाहू महाराजांची विचारनगरी राधानगरीच्या निसर्गरम्य परिसरातील निवासी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
----
इचलकरंजीत
आज कार्यक्रम
इचलकरंजी : महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. ६) दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमास कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता अंकुश कावळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दिवसभर रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, प्रभात फेरी, कर्मचारी गुणगौरव समारंभ यासह मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. नंदादीप नेत्रालयातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे, अशी माहिती महावितरणतर्फे दिली आहे.
----
राऊंड टेबलतर्फे
पेव्हिंग ब्लॉक
इचलकरंजी : येथील सन्मती बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेला इचलकरंजी राऊंड टेबल यांच्याकडून पेव्हिंग ब्लॉक दिले. शाळेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान आहे. मात्र, पेव्हिंग ब्लॉक नसल्यामुळे तेथे उंदीर, घुशी यांचा उपद्रव वाढला होता. त्यासाठी इचलकरंजी राऊंड टेबलला शाळेने पेव्हिंग ब्लॉकसंदर्भात मागणी केली. त्यानुसार पेव्हिंग ब्लॉक शाळेला दिले. राऊंड टेबलचे अध्यक्ष गौरव सावंत, रोहित इंगळे, संस्थेचे अध्यक्ष पी. जे. बडबडे, आदी उपस्थित होते. संजय कोले यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com