मॉन्सूनचा भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम

मॉन्सूनचा भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम

08841
इचलकरंजी : १) मृग नक्षत्राच्या पार्श्‍वभूमीवर शेवग्याची भाजी विक्रीस आहे.
08842
२) फळ बाजारात शिंगाडा हे फळ दाखल झाले आहे.

मॉन्सूनचा भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम
टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ ः कोथिंबीरचे वाढलेले भाव जैसे थे
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : मॉन्सूनच्या तोंडावर अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे या आठवड्यात भाजीपाल्याच्या आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. आधीच उन्हाळ्यात घटलेली आवक आणि त्यात पावसाची भर पडत २० टक्क्यांनी बाजार समितीत आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. टोमॅटोचा माल खराब होत असल्याने दर दुपटीने वाढत आहेत. फ्लॉवर, बीन्स, गवार आवाक्याबाहेर जात आहे. उद्या (ता. ७) आठवडा बाजारामुळे आवक वाढण्याची आशा व्यापारी, विक्रेत्यांना आहे.
पालेभाज्यांचे भाव अद्याप रुळावर येताना दिसत नाहीत. ५० च्या पुढे गेलेले कोथिंबीरचे भाव जैसे थे आहेत. गायब झालेली शेपूची भाजी विक्रेत्यांकडे दिसू लागल्याने ग्राहक तुटून पडत आहेत. फळ बाजारात हंगामी फळांची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. चेरी, शिंगाडा आदी नवीन फळे दाखल होत आहेत. आंब्याचा हंगाम आटोपता असून बेबी हापूस मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांकडे विक्रीस आहे. फूल बाजारात फुलांचे दर वाढत्या मार्गावर आहेत. येत्या काळात पावसामुळे दरवाढ सहन करावी लागणार आहे. खाद्यतेल बाजारात तेलाचा अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. धान्य बाजारात मागील आठवड्यात वाढेलेले डाळींचे आणि तांदळाचे दर टिकून आहेत.

प्रति किलो रुपये भाज्यांचे दर-
टोमॅटो- ४० ते ५०, दोडका- ६० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ८० ते १००, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ७० ते ८०, कोबी- २० ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा - ३० ते ३५, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ५०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- २२० ते २५०, गवार - ८० ते १००, भेंडी-४० ते ५०, काकडी- ५० ते ६०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - २० ते २५, कोथिंबीर - ५० ते ६०, मेथी, शेपू - ३० ते ३५, शेवगा - ८ ते १० रुपये नग.
- - --- - - -
फुले : झेंडू - १२० ते १५०, निशिगंध - १०० ते १२०, गुलाब - १५० ते २००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १८० ते २००.
- - -- - -
फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.
-- -
खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ८५ ते ८८, तूरडाळ- १७० ते १८०, मूगडाळ - ११५ ते १२०, मसूरडाळ - ८२ ते ९०, उडीदडाळ- १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १२० ते १४०, मटकी- ११० ते १२०, मसूर- ७० ते ९०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ११० ते १४०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला -१४० ते १६०.
--------
शेवग्याला आला भाव
शेवग्याला मागणी वाढली असून प्रति शेंगाचे दर दुपटीने वाढले आहेत. तसेच शुक्रवारी (ता. ७) सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश असल्याने या मिरगाला शेवग्याच्या भाजीला मोठी मागणी असते. या दिवशी भाजीला आहारात खूप महत्त्व असते. त्यामुळे बाजारात शेवग्याची भाजी विक्रीस आहे.

---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com