विविध कार्यक्रमांनी महावितरणचा वर्धापन दिन

विविध कार्यक्रमांनी महावितरणचा वर्धापन दिन

08851
इचलकरंजी : महावितरण वर्धापन दिनी ‘ऊर्जाशिरोमणी’ पुरस्कार कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने यांना देऊन सन्मानित केले.

विविध कार्यक्रमांनी महावितरणचा वर्धापन दिन
कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने यांना ‘ऊर्जाशिरोमणी’ पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ७ : महावितरणचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. वार्षिक ऊर्जा पुरस्काराचे वितरण मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते करण्‍यात आले. यंदाचा ‘ऊर्जाशिरोमणी’ पुरस्कार कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने यांना प्राप्त झाला. वर्धापनदिनी ‘नटरंग उभा’, प्रभातफेरी, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम झाले.
येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात वर्धापन दिन कार्यक्रम झाला. अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) सुधाकर जाधव, सहायक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) स्नेहा पार्टे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अभिजित सिकनीस, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात कोल्हापूर परिमंडळ हे सर्वच बाबतीत अग्रस्थानी आहे. ही सातत्यपूर्ण कामगिरी राखण्यात अभियंते, अधिकारी अन् ऊर्जामित्र यांचे एकसंध परिश्रम व लोकाभिमुख सेवा हे प्रमुख घटक आहेत. यापुढेही ग्राहकहितार्थ अशीच कर्तव्य व सेवा बजावण्याचे आवाहन मुख्य अभियंता भागवत यांनी केले.
क्रीडा रत्न-जोतिबा ओऊळकर (कुस्ती रौपयपदक), अपर्णा महाडिक ( रोलबॉल प्रशिक्षक), ऊर्जारत्न पुरस्कार-प्रवीण पंचमुख, सूरजकुमार जाधव व जयंत चौधरी, साईप्रकाश आरळी, रामेश्वर कसबे, मुकुंद आंबी, गणेश गलांडे, उत्तम लांडगे, अनुप बेटगिरी, अमृता पाटील, रोहितेज पाटील, अस्मिता जाधव, स्वरूप नकाते, सुप्रिया बोधले. ऊर्जाभूषण पुरस्कार प्रसाद भालचिम, विश्‍वजित कांबळे व मिलिंद कांबळे, सुनील धुळुगडे, कपिल जाधव, प्रकाश पाटील, सुमैय्या जमादार, निहाल नायकवडी, संतोष पाटील, प्रियंका पाटील, विकास कनसे, शरद पाटील, सम्राट पाटील, सलिम मुजावर, अमित कुदळे, ऋषिकेश खांबे, स्वप्निल दळवी व कुमार कलकुट्टी, उमेश हराळे, आदी कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन ऊर्जा पुरस्काराचे वितरण केले. कॅनव्हास चित्रे स्पर्धेतील माधुरी पाटणकर (प्रथम), स्वरदा तिपाण्णावर (तृतीय), बाजीराव पाटील (उत्तेजनार्थ) व सहभागींचा सन्मान केला. रांगोळी, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com