‘सिद्धीविनायक’च्या महिलांची भजन सेवा

‘सिद्धीविनायक’च्या महिलांची भजन सेवा

‘सिद्धिविनायक’च्या
महिलांची भजन सेवा
इचलकरंजी : सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाची श्रीक्षेत्र शेगाव गजानन महाराज समाधी मंदिर आणि श्रीक्षेत्र कारंजा गुरू मंदिर येथे भजन सेवा झाली. शेगाव येथे श्री गजानन महाराज विजय ग्रंथाच्या पारायणानिमित्त समाधी मंडपात भजन सेवेचे आयोजन केले होते. यामध्ये महाराजांच्या विविध पदांना गायन साथ भजनप्रमुख रोहिणी कुलकर्णी, शोभा सोलापुरे, वीणा कुलकर्णी, शरयू गिजरे, वैशाली मिराशी यांनी केली. त्यांना संगीत साथ भजन प्रशिक्षक सागर जोशी - हार्मोनियम, सुधीर कुलकर्णी - तबला, दत्तात्रय मुळे आणि विनायक शिंदे - तालवाद्य यांनी केली. यावेळी संत गजानन महाराज प्रतिष्ठान, कोरोचीचे भक्त मंडळ उपस्थित होते.
-----
माजी विद्यार्थिनींचा
१६ ला स्नेहमेळावा
इचलकरंजी : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा १६ जून रोजी आयोजित केला आहे. या शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या पहिल्या बॅचमधील मुली आज साधारण सत्तर वर्षे वयाच्या आसपास आहेत. त्यांच्यातही शाळेला भेट देण्याची तीव्र भावना निर्माण झाली असल्याचे पाहावयास मिळते. तिशी, चाळीशीपासून, पन्नाशी, साठी पूर्ण केलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींनी स्नेहमेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी माजी विद्यार्थिनींनी स्नेहमेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. स्नेहमेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
----
समाजवादी प्रबोधिनीतर्फे
वाचनालयात वृक्षारोपण
इचलकरंजी : वसुंधरेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयात वृक्षारोपण करण्यात आले. वाचनालयाचे ज्येष्ठ वाचक धोंडीराम शिंगारे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान’ राबवण्यात आले. अभियानाचे महत्त्व अजित माने, रोहित लाखे, जयेश कांबळे, काजल कदम, मयुरी जमाले यांनी स्पष्ट केले. प्रसाद कुलकर्णी, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, भीमराव नाईकवडी, अंकुश भोसले, प्रदीप शेटे आदी उपस्थित होते.
----
मर्दा वसतिगृहात
मोफत प्रवेश सुरू
इचलकरंजी : दगडूलाल मर्दा वसतिगृहात मोफत प्रवेश देणे सुरू झाले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित, मागासवर्गीय पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत प्रवेश देण्यात येतो. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त व भटक्या, विशेष मागास, आर्थिक मागास अशा विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू झाला आहे. सर्व सुविधांनीयुक्त अशा वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.
-----
समाजवादी प्रबोधिनीत
उद्या व्याख्यान
इचलकरंजी : साने गुरुजी समविचारी मंचातर्फे समाजवादी प्रबोधिनीत व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com