विविध आंदोलनांनी गाजला मंगळवार

विविध आंदोलनांनी गाजला मंगळवार

ich223,4,5.jpg
94327
इचलकरंजी : १) स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दर्शवत समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
94328
२) गांधी पुतळा चौकात सकल हिंदू समाजातर्फे उपोषण केले.
94329
३) भाजपाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचा निषेध केला.
----------
विविध आंदोलनांनी गाजला मंगळवार
इचलकरंजीत निदर्शने, उपोषण : पोलिसांची तारांबळ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : शहरात आजचा दिवस विविध आंदोलनांनी गाजला. विविध मुद्यांच्या प्रश्नांवर गांधी पुतळा चौकात उपोषण, निदर्शने तर महावितरण कार्यालयावरही निदर्शने केली. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. एकाच वेळी झालेल्या तीन आंदोलनांमुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली.
* महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
घेणार नाही, घेणार नाही प्रीपेड मीटर घेणार नाही, प्रीपेड मीटर रद्द करा, अशा घोषणांनी समाजवादी पार्टीतर्फे महावितरण कार्यालय परिसर दणाणून सोडला. स्मार्ट प्रीपेड मीटरला संपूर्ण नकार आणि सध्याचे पोस्टपेड मीटर्स व जोडण्या आहेत त्‍या चालू ठेवण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी तक्रारी असताना प्रीपेड मीटर कशासाठी? असा सवाल करत कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना या फसव्या योजनेची खरी स्पष्टता करण्याचे आवाहन केले. मागणीचे निवेदन श्री. राठी यांना दिले. सक्तीने प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास प्रखर आंदोलनाचा इशाराही दिला. आंदोलनात जाविद मोमीन, उषा कांबळे, आदी सहभागी झाले होते.
----
नकारासाठी नमुना अर्जाचे वाटप
आंदोलनानंतर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेतर्फे जनहितार्थ प्रकाशित केलेले स्मार्ट प्रीपेड मीटर अमान्य-नमुना अर्जाचे वाटप करण्यात आले. आपल्या घरातील वीज मीटर ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यानुसार याबाबत प्रत्येकाने नमुना फॉर्म भरून त्याला अंतिम बिलाची प्रत जोडावी आणि महावितरण कार्यालयात जमा करण्याचे आवाहन श्री. होगाडे यांनी केले.
---
लवजिहाद विरोधात उपोषण
इचलकरंजीत घडलेल्या अतिप्रसंग घटनेतील धर्मांध जिहाद्यास कठोर शासन होऊन कायदेशीर कारवाई करावी, राज्यात लवजिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी सकल हिंदू समाजातर्फे गांधी चौक येथे उपोषण केले. दरम्यान, उपोषणस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. उपोषणात शिवाजी व्यास, प्रवीण सामंत, मंगेश मस्कर, भगवान खंडेलवाल, आदी सहभागी झाले होते.

गांधी पुतळा चौकात निदर्शने
संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने केली. राहुल गांधी यांचा धिक्कार करत त्यांच्या प्रतीकात्मक फलकास जोडे मारून फलक जाळला. राहुल गांधी यांनी हिंदू धर्माची माफी मागावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी दिला. सरचिटणीस राजेश रजपुते, बाळकृष्ण तोतला, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, दीपक पाटील, उमाकांत दाभोळे, अनिस म्हालदार, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com