राऊंड टेबल इंडियातर्फे विद्यार्थ्यांना विमान प्रवास

राऊंड टेबल इंडियातर्फे विद्यार्थ्यांना विमान प्रवास

ich34-F.jpg
94576
इचलकरंजी : येथील राऊंड टेबल इंडिया संस्थेने आंतरभारती विद्यालयातील विद्यार्थ्यांचा विमानप्रवास घडवला.

राऊंड टेबल इंडियातर्फे
विद्यार्थ्यांना विमान प्रवास
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : वस्त्रनगरीत कामगारवस्तीत, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची बाहेरगावी जाण्यासाठी एसटी बस, फार तर रेल्वेची सफर होतेच. मात्र, आपलं छोटेस घर उंच उंच जाऊन त्या विमानातून पाहण्याची स्वप्ने अशा विद्यार्थ्यांना पडतच असतात. अशी स्वप्ने जेव्हा सत्यात उतरतात आणि विद्यार्थी प्रत्यक्ष हवाई सफरीचा अनुभव घेतात तेव्हा तो आनंद स्वप्नाच्या पलीकडे असतो. येथील राऊंड टेबल इंडिया इचलकरंजीने हाच अनुभव आंतरभारती विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना देत कोल्हापूर ते हैदराबाद विमान प्रवास घडवला.
मोफतपणे हैदराबाद सिटी, गोवळकोंडा किल्ला, रामोजी फिल्म सिटी सर्व सुविधांनी युक्त विद्यार्थ्यांना दाखवले. कोल्हापूर विमानतळावर खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. हवाई सफरीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यासाठी राउंड टेबल इचलकरंजीचे अध्यक्ष गौरव सावंत, क्षेत्रीय अध्यक्ष विपुल भुतडा, प्रकल्प समन्वयक अमित राठी, सांगलीचे अध्यक्ष शैलेश सारडा, ऋषी बोहरा, राहुल शहा, आदींचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com