हद्दपार दोघे ताब्यात

हद्दपार दोघे ताब्यात

चंद्रकांत आळेकट्टी 09093
अमोल कामते 09092

केसरी गँगमधील हद्दपार दोघांवर कारवाई
इचलकरंजी पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशन मोहीम; सहा दुचाकीही ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : हद्दपार असताना वावरणाऱ्या एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याच्यावरील कारवाई ताजी असताना पोलिसांनी अशीच कारवाई केसरी गँगमधील दोघांवर केली.
चंद्रकांत बाळू आळेकट्टी व अमोल शिवाजी कामते (दोघे रा. आसरानगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोघांना घरातून ताब्यात घेतले. हे ऑपरेशन आसरानगर, सहकारनगर भागात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत इचलकरंजी पोलिसांनी राबवले.
शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा वाढता सहभाग पार्श्‍वभूमीवर पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी कोम्बिंग ऑपरेशन मोहीम हाती घेतली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकासह शुक्रवारी (ता. ५) रात्रीपासून गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवली. आसरानगर, सहकारनगर, साईट नं. १०२ भागात निर्जनस्थळे, हद्दपार गुन्हेगारांची घरांची झाडाझडती घेतली. या वेळी चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार केलेल्या केसरी गँगचे दोघे घरात मिळाले.
आळेकट्टी व कामते दोघे हद्दीपारीनंतरही घरात मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ऑपरेशनदरम्यान सहकारनगर भागात संशयित सहा मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. तसेच दारू विक्री करताना दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत उपाधीक्षक साळवे, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, प्रवीण खानापुरे, सचिन सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com